भाजप पक्षात आता वैचारिक दिवाळखोरी दिसू लागली.... - Ideological bankruptcy is now visible in BJP party .... | Politics Marathi News - Sarkarnama

भाजप पक्षात आता वैचारिक दिवाळखोरी दिसू लागली....

सरकारनामा ब्यूरो
गुरुवार, 24 जून 2021

महाराष्ट्राच्या विकासाची त्यांच्या कार्यकारिणीत चर्चा झाली नाही. याचा अर्थ भाजप कार्यकिरिणीला दुसरे काही काम राहिले नाही, हे सिद्ध होते, अशी खरमरीत टीका ना. जयंत पाटील यांनी केली आहे.

मुंबई : एका अटक झालेल्या अधिकाऱ्याने पत्र लिहून वाटेल तसे बेछूट आरोप केले आहेत. जिलेटिनच्या कांड्या ठेवण्यासारखा गंभीर आरोप असलेल्या अधिकाऱ्याच्या म्हणण्यावर भाजप कार्यकारिणी जर एखादा ठराव करत असेल तर मला वाटतं. भाजप पक्षात वैचारिक दिवाळखोरी आली आहे, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी केला आहे. Ideological bankruptcy is now visible in BJP party says Minister Jayant Patil

ज्या व्यक्तीवर गंभीर आरोप आहेत, ज्याचा तपास एनआयए करत आहे, अशा अधिकाऱ्याने लिहिलेली पत्रं ही दबावापोटी लिहून घेतलेली आहेत की अशीच लिहिलेली आहेत. हे समजण्याइतकी महाराष्ट्राची जनता दुधखुळी नाही, असे स्पष्ट करून जयंत पाटील म्हणाले, ही पत्र दबावाखालीच लिहून घेतली असल्याची आमची खात्री आहे. त्यामुळे त्यात जे उल्लेख केलेले आहेत, ते निखालस खोटे आहेत. 

हेही वाचा : सत्ता असताना भाजपने `ओबीसी`साठी काय केले?

हातात काहीच सापडत नाही, त्यामुळे राज्यात संशयाचे भूत निर्माण करण्यासाठी भाजप इतक्या खालच्या पातळीवर उतरला आहे की, चौकशी करण्याची मागणी करत आहे. महाराष्ट्राच्या विकासाची त्यांच्या कार्यकारिणीत चर्चा झाली नाही. याचा अर्थ भाजप कार्यकिरिणीला दुसरे काही काम राहिले नाही, हे सिद्ध होते, अशी खरमरीत टीका ना. जयंत पाटील यांनी केली आहे.

आवश्य वाचा : ओबीसी आरक्षणावरुन खडसेंच्या कुटुंबातच वाद

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख