ओबीसी आरक्षणावरुन खडसेंच्या कुटुंबातच वाद

ओबीसी आरक्षणावरून माजी मंत्री एकनाथ खडसे यांची मुलगी आणि सून यांच्यात राजकीय संघर्ष सुरू झाला आहे.
bjp mp raksha khadse slams ncp leader rohini khadse over obc reservation
bjp mp raksha khadse slams ncp leader rohini khadse over obc reservation

जळगाव : भाजपने (BJP) ओबीसी (OBC) समाजाचा विचार केला नसता तर विधानसभा निवडणुकीत रोहिणी खडसे (Rohini Khadse) यांना संधी मिळाली नसती, असा टोला भाजपच्या खासदार रक्षा खडसे (Raksha Khadse) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या रोहिणी खडसे यांना लगावला आहे. ओबीसी आरक्षणावरून माजी मंत्री एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांची मुलगी आणि सून यांच्यात राजकीय सामना सुरू झाला आहे. 

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांच्या अॅड. रोहिणी खडसे या कन्या आहेत. त्या जिल्हा बँकेच्या अध्यक्षा आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या त्या सदस्या आहेत. रक्षा खडसे या एकनाथ खडसे यांच्या सून आहेत. त्यामुळे दोघींचे नणंद भावजयीचे नाते आहे. ओबीसी आरक्षणावरून रोहिणी खडसे यांनी भाजपवर जोरदार हल्ला चढवला  होता. यावर खासदार रक्षा खडसे यांनी ही तेवढ्याच ताकदीने उत्तर दिले आहे. यामुळे ओबीसी आरक्षणावरुन खडसे कुटुंबातच वाद निर्माण झाल्याचे दिसत आहेत.  

रक्षा खडसे यांनी म्हटले आहे की, भाजपने ओबीसी समाजाचा विचार केला नसता तर आमच्या सारख्या ओबीसींना संधी मिळाली नसती. तसेच,  २०१९ मध्ये भाजपने रोहिणी खडसे यांना मुक्ताईनगर विधानसभेची उमेदवारीही दिली नसती. 

काय म्हणाल्या होत्या रोहिणी खडसे? 
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात जिल्हा परिषद निवडणुकीत ओबीसी आरक्षित जागा रद्द झाल्यास  भाजपतर्फे ओबीसी उमेदवार देण्यात येतील, अशी घोषणा केली आहे. त्यावर रोहिणी खडसे यांनी उत्तर दिले होते. त्यांनी म्हटले होते की, भाजपला ओबीसीचा कळवळा कधीपासून यायला लागला? ओबीसी नेत्यांचे नेतृत्व संपविताना हा कळवळा कुठे गेला होता?....आता गळा काढण्यात अर्थ नाही. 

रोहिणी खडसे यांनी ट्विट करून फडणवीस यांना धारेवर धरल्यामुळे भाजप काय उत्तर देणार याकडे लक्ष लागले होते. दुसरीकडे त्यांच्या भावजय भाजप खासदार रक्षा खडसे यांच्या नेतत्वाखाली उद्या ओबीसी आरक्षण रद्द करू नये, या मागणीसाठी जळगावात चक्का जाम आंदोलन आहे. रक्षा खडसे या भाजपतर्फे आयोजित ओबीसी बैठकीसाठी मुंबईत उपस्थित होत्या. त्यांना भाजप ओबीसी चेहरा म्हणून पाहत आहे. ओबीसी आरक्षणावरुन या दोघी आता समोरासमोर आल्या आहेत. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com