आनंदाची बातमी : अनुदानित वसतीगृहातील कर्मचाऱ्यांचे मानधन वाढले 

राज्यभरातील अनुदानित वसतीगृहात काम करणाऱ्या दोन हजार ३८८ अधीक्षकांचं मानधन दहा हजार रुपये, दोन हजार ८५८ स्वयंपाकींचं मानधन आठ हजार रुपये, तर ४७० मदतनीसांचं आणि दोन हजार ३८८ चौकीदारांचे मानधन प्रत्येकी साडेसात हजार रुपये करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
आनंदाची बातमी : अनुदानित वसतीगृहातील कर्मचाऱ्यांचे मानधन वाढले 
The good news: the honorarium of the staff of the subsidized hostel has increased

मुंबई : सामाजिक न्याय विभागातंर्गत स्वयंसेवी संस्थांव्दारे चालविण्यात येणाऱ्या अनुदानित वसतीगृहांत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या मानधनात एक जुलैपासून वाढ करण्याचा महत्वपूर्ण निर्णय आज घेण्यात आला आहे. राज्यातील दोन हजार ३८८ अनुदानित वसतीगृहात काम करणाऱ्या आठ हजार १०४ कर्मचाऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे. The good news: the honorarium of the staff of the subsidized hostel has increased

सामाजिक न्याय विभागांतर्गत स्वयंसेवी संस्थांद्वारे चालवण्यात येणाऱ्या अनुदानित वसतीगृहांत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या मानधनाच्या प्रश्नासंदर्भात आज बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी कर्मचाऱ्यांच्या मानधनात एक जुलै २०२१ पासून वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला.

सामाजिक न्याय विभागांतर्गत राज्यात सुरु असणाऱ्या दोन हजार ३८८ अनुदानित वसतीगृहात काम करणाऱ्या अधिक्षक, स्वयंपाकी, मदतनीस आणि चौकीदार अशा एकूण आठ हजार १०४ कर्मचाऱ्यांच्या मानधनात वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

यामुळे राज्यभरातील अनुदानित वसतीगृहात काम करणाऱ्या दोन हजार ३८८ अधीक्षकांचं मानधन दहा हजार रुपये, दोन हजार ८५८ स्वयंपाकींचं मानधन आठ हजार रुपये, तर ४७० मदतनीसांचं आणि दोन हजार ३८८ चौकीदारांचे मानधन प्रत्येकी साडेसात हजार रुपये करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in