खासदार म्हणाली, माझे लग्नच अवैध! - Trinamool MP Nusrat Jahan says my marriage is illegal | Politics Marathi News - Sarkarnama

खासदार म्हणाली, माझे लग्नच अवैध!

सरकारनामा ब्यूरो
बुधवार, 9 जून 2021

भारतीय कायद्यानुसार ते लग्न नव्हते, ते फक्त एक नाते किंवा लिव्ह-इन रिलेशनशिप होते.

नवी दिल्ली : अभिनेत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या (Trinamool Congress) खासदार नुसरत जहाँ (MP Nusrat Jahan) यांच्या मोडलेल्या विवाहाची चर्चा गेल्या काही दिवसांपासून रंगली आहे. त्यावर अनेक तर्क-वितर्क लावले जाऊ लागले होते. आता या प्रकरणात खुद्द नुसरत जहाँ यांनीच या प्रकरणावर खुलासा केला आहे. यासाठी त्यांनी ७ मुद्द्यांवर स्पष्टीकरण देणारे जाहीर निवेदनच आहे. निखिल जैनसोबत झालेला विवाह हा भारतीय कायद्याच्या दृष्टीने अवैध होता, असा खुलासा त्यांनी केला आहे. तसेच, हा विवाह तुर्की कायद्यानुसार झाला होता, त्यामुळे तो भारतीय कायद्यानुसार अवैध असल्याचे देखील त्यांनी सांगितले आहे. (Trinamool MP Nusrat Jahan says my marriage is illegal)

नुसरत जहाँ म्हणतात, आमचे लग्न तुर्की कायद्यानुसार झाले होते. ते भारतीय विशेष विवाह कायद्यानुसार वैध होणे आवश्यक होते. पण ते झाले नाही. भारतीय कायद्यानुसार ते लग्न नव्हते, ते फक्त एक नाते किंवा लिव्ह-इन रिलेशनशिप होते. त्यामुळे औपचारिक घटस्फोटाचा प्रश्नच येत नसल्याचेही त्या म्हणाल्या. आम्ही फार पूर्वीच वेगळे झालो होतो. मात्र, मी त्यावर भाष्य टाळले होते. त्यामुळे माझ्या कृतीवर कुणीही आक्षेप घेण्याचे कारण नाही असे त्यांनी स्पष्ट केले आहे.

हे ही वाचा : मंगलदास बांदलांची १४ दिवसांच्या पोलिस कोठडीनंतर येरवडा कारागृहात रवानगी

नुसरत जहाँ यांनी आपल्या पैशांचा आपल्या परवानगीशिवाय वापर होत असल्याचा आरोप केला आहे. जे स्वत: श्रीमंत असल्याचा दावा करत आहेत, निखिल जैन त्यांनीच माझ्या बँकेतून अवैधरीत्या पैसे काढले आहेत. आम्ही वेगळे झाल्यानंतरही त्यांनी पैसे काढले असल्याचे नुसरत जहाँ  यांनी म्हटले आहे. यासंदर्भात मी बँकेकडे तक्रार केली असून पोलिसात देखील लवकरच तक्रार केली करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

हे निवेदन जाहीर करण्याआधी त्यांनी आपल्या इन्स्टाग्रामवर एक सूचक पोस्ट देखील केली होती. “तोंड बंद ठेऊ शकणारी महिला म्हणून मला इतिहास ओळखणार नाही. आणि माझी त्याला काहीही हरकत नाही” असे पोस्टमध्ये म्हटले आहे. 

हे ही वाचा : काँग्रेस-राष्ट्रवादीचे वाजले: महापौरांविरोधात नगरसेवकांची विश्वजित कदमांकडे तक्रार 

माझा संबंध नसलेल्या व्यक्तीच्या वैयक्तिक आयुष्याबाबत मी बोलणार नाही. माझी माध्यमांना विनंती आहे की माझ्याशी बऱ्याच काळापासून संबंधित नसललेल्या व्यक्तीला तुम्ही काहीही प्रश्न विचारू नका. माझी प्रतिमा मलीन करण्यासाठी एका व्यक्तीला हिरो करून माहिती घेणे अपेक्षीत नाही. 

नुसरत यांनी २०१९मध्ये उद्योजक निखिल जैन यांच्याशी लग्न केले होते. त्या दोघांचे लग्नातील फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले होते. पण गेल्या सहा महिन्यांपासून नुसरत आणि निखिल मध्ये दुरावा निर्माण झाल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. 
Edited By - Amol Jaybhaye    

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख