केमिस्ट अधिकारी मृत्यूप्रकरणी माजी आमदार प्रभाकर घार्गे यांना अटक; १५ मेपर्यंत पोलिस कोठडी   - Former MLA Prabhakar Gharge arrested in chemist officer death case; Police custody till May 15 | Politics Marathi News - Sarkarnama

केमिस्ट अधिकारी मृत्यूप्रकरणी माजी आमदार प्रभाकर घार्गे यांना अटक; १५ मेपर्यंत पोलिस कोठडी  

सरकारनामा ब्यूरो
बुधवार, 12 मे 2021

 माजी आमदार प्रभाकर घार्गे यांनी उच्च न्यायालयात प्रकृतीचे कारण देत जामीन अर्ज दाखल केला होता. परंतु न्यायालयाने त्यांचा जामीन अर्ज फेटाळला होता. त्यांच्या विरुध्द अटक वॉरंट न्यायालयाने काढले होते. त्यानंतर सातारा येथे वैद्यकीय उपचारासाठी एका हॉस्पिटलमध्ये ते दाखल झाले होते.

सातारा : खटाव - माण ॲग्रो प्रोसेसिंग पडळ (Khatav-Maan Agro processing) या साखर कारखान्यावरील केमिस्ट अधिकारी जगदीप थोरात (Jagdip Thorat) यांना झालेल्या मारहाणीत त्यांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी राष्ट्रवादीचे (Nationalist Congress) माजी आमदार प्रभाकर घार्गे (Prabhakar Gharge) यांना वडूज पोलिसांनी अटक केली. त्यांना न्यायालयात हजर केले असता शनिवार (ता. १५) पर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश वडूज न्यायालयाने (Vaduj Court) दिले आहेत. (Former MLA Prabhakar Gharge arrested in chemist officer death case; Police custody till May 15)

माण-खटाव ॲग्रो प्रोसेसिंग या साखर कारखान्याचे केमिस्ट अधिकारी जगदीप थोरात (रा. गोवारे ता. कऱ्हाड) यांच्या मृत्यूप्रकरणी वडूज पोलिसांत एकूण वीस जणांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. यापूर्वी सात ते आठ आरोपींना वडूज पोलिसांनी अटक केली होती. दरम्यान, माजी आमदार प्रभाकर घार्गे यांनी उच्च न्यायालयात प्रकृतीचे कारण देत जामीन अर्ज दाखल केला होता. परंतु न्यायालयाने त्यांचा जामीन अर्ज फेटाळला होता. 

हेही वाचा : कोरोना ओसरतोय अन् इंधन दरवाढीचा कहर; राज्यात पेट्रोल शंभरीपार

त्यांच्या विरुध्द अटक वॉरंट न्यायालयाने काढले होते. त्यानंतर सातारा येथे वैद्यकीय उपचारासाठी एका हॉस्पिटलमध्ये ते दाखल झाले होते. त्यांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज दिल्यानंतर वडूज पोलिसांनी त्यांना सातारा येथून ताब्यात घेतले. जगदीप थोरात (रा. गोवारे ता. कऱ्हाड) यांच्या मृत्यू प्रकरणी वडूज पोलित एकूण वीस जणांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. 

हेही वाचा : पालिकेने जबाबदारी झटकली तरी आयुक्त कृष्णप्रकाश धावले कोरोना रुग्णांच्या मदतीला

माजी आमदार प्रभाकर घार्गे यांना वडूज येथील प्रथम वर्ग न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने शनिवार (ता.१५) पर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. याबाबतचा अधिक तपास सहायक पोलिस निरिक्षक मालोजीराव देशमुख करत आहेत.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख