पालिकेने जबाबदारी झटकली तरी आयुक्त कृष्णप्रकाश धावले कोरोना रुग्णांच्या मदतीला  

प्रशासनाने आज जबाबदारी झटकत ते कोरोना सेंटरचालक ठेकेदाराच्या पाठीशी उभे राहिले.
 Pimpri Chinchwad Police Has Started Helpline For Covid 19 .jpg
Pimpri Chinchwad Police Has Started Helpline For Covid 19 .jpg

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या कोरोना सेंटरमधील मृत रुग्णांच्या दागिन्यांच्या चोरीबाबत प्रशासनाने मंगळवारी जबाबदारी झटकत ते कोरोना सेंटरचालक ठेकेदाराच्या पाठीशी उभे राहिले. त्याचवेळी पिंपरी-चिंचवड (Pimpri Chinchwad) पोलिस आयुक्त कृष्णप्रकाश (Krishnaprakash) हे, मात्र कोरोना रुग्णच नाही, तर त्यांचे नातेवाईक व एकूणच ही साथ आटोक्यात येण्याकरिता मदतीला धावून आले आहेत. त्यांनी यासाठी पोलिस सॅमरिटन हेल्पलाईन सुरु केली असून ती १५ मे पासून सुरु होणार आहे. (Pimpri Chinchwad Police Has Started Helpline For Covid 19)

सध्या शहरातील बहूतांश कोरोना रुग्ण हे गृह विलगीकरणात आहेत. त्यातील अनेक बिनधास्त फिरून कोरोनाचा आणखी फैलाव करीत आहेत. तसेच अनेक ठिकाणी सामाजिक अंतर राखले जात नसल्यानेही ही साथ पसरत आहे. अनेकजण तरुण मास्क न वापरता चकाट्या पिटत आहेत. त्याचाही फटका बसतो आहे. तर, अनेक दुकाने वेळेचे उल्लंघन करीत आहेत. या सर्व नियमभंगाची तक्रार शहरवासियांना या पोलिसांच्या हेल्पलाईनवर देता येणार आहे. त्याव्दारे या रोगाचा प्रसार करणाऱ्यांवर पोलिस दंड व तत्सम कारवाई करणार आहेत.

त्याजोडीने रुग्णवाहिकांकडून होणारी कोरोना रुग्ण व नातेवाईकांची लूट, रुग्णालयात दाखल करण्यासाठी घेण्यात येणारे अवास्तव पैसे याबाबतही येथे मदत दिली जाणार आहे. एखाद्या पूर्ण कुटुंबाला, जर या साथीचा प्रार्दूभाव झाला, तर त्यांना औषध, जेवण व भाजीपाल्यासाठी या हेल्पलाईनवरून सहाय्य केले जाणार आहे. एखादे लहान मूल, जर अनाथ झाले, तर त्याचा सांभाळण्यासाठीही येथे मदत मिळणार आहे.

पोलिस आयुक्त कृष्णप्रकाश यांची ही संकल्पना आहे. ती त्यांनी महासेतू सोल्यूशन एलएलपी आणि ग्लोबल ह्यूमन ऑर्गनायझेशनच्या  समनव्यातून अंमलात येत आहे. यासंदर्भात कृष्णप्रकाश म्हणाले, कोरोनाचा मोठा प्रार्दूभाव झाल्याने नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते आहे. त्यांची सोडवणूक कशी करता येईल, कशी व कुणाची मदत घेता येईल, हा प्रश्न त्यांना भेडसावतो आहे. त्यासाठी ही हेल्पलाईन सुरु करण्यात येत असून त्यावर वरील तक्रारींसाठी संपर्क साधावा.

पोलिस हेल्पलाईन क्रमांक ः ८०१०४३०००७, ८०१०८१०००७, ८०१०४६

दरम्यान, पालिकेच्या ऑटोक्लस्टर कोविड सेंटरनंतर पालिकेच्याच जंबो कोविड सेंटरमध्येही मृत कोरोना रुग्णाचे दागिने चोरीला गेल्याची पालिकेच्या दृष्टीने लाजीरवाणी घटना नुकतीच उघडकीस आली. त्यातील एका घटनेचा पोलिस तपासही करीत आहेत. त्याबाबत जंबो सेंटर चालक ठेकेदाराचे कान उपटण्याऐवजी पालिका मंगळवारी त्याच्या पाठीशी उभी राहिल्याचे दिसले. या चोरीची जबाबदारी झटकत त्यांनी ठेकेदाराची बाजू घेतली.

रुग्णाचे दागिने तो दाखल होतानाच नातेवाईकांकडे सुपूर्त केले जात असल्याचे व ते गहाळ झाले, तर त्याला सेंटर व्यवस्थापन जबाबदार असणार नाही, या असे लिहून घेतले जात आहे, असे मंगळवारी पालिकेतर्फे या चोरीच्या घटनेवर घेण्यात आलेल्या बैठकीनंतर सांगण्यात आले. असेच लेखी संमतीपत्र मृतदेह ताब्यात घेणा-या नातेवाईकांकडून घेतले जात असल्याचे सांगत पालिकेने या चोरीच्या घटनांतून आपले संपूर्ण अंग काढून घेतले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com