कोरोना ओसरतोय अन् इंधन दरवाढीचा कहर; राज्यात पेट्रोल शंभरीपार  - Petrol and diesel prices have Hike up again in the state | Politics Marathi News - Sarkarnama

कोरोना ओसरतोय अन् इंधन दरवाढीचा कहर; राज्यात पेट्रोल शंभरीपार 

सरकारनामा ब्यूरो
बुधवार, 12 मे 2021

सध्याच्या कोरोनाच्या काळात सर्वसामान्यांची आर्थिक आवक मंदावली असतानाच केंद्र सरकार मात्र दिलासा देण्याऐवजी त्यांच्या जीवनावश्यक वस्तूंमध्ये दरवाढ करून त्यांची गळचेपी करत आहे.

परभणी : कोरोनामुळे लाॅकडाऊन आणि कडक निर्बंध असल्यामुळे आधीच राज्यातील सर्वसामान्य जनता मेटाकुटीला आली आहे. त्यातच पेट्रोलचे दर आकाशाला भिडत आहेत. (Petrol price Hike in Parbhani) राज्यात परभणीत पेट्रोलने शंभरी गाठली. आज परभणीकरांना एक लिटर पेट्रोलसाठी १००.७० पैसे तर डिझेलसाठी ९०.६३ पैसे मोजावे लागत आहेत. पेट्रोल २४ पैसे तर डिझेलच्या दरात  २६ पैशांनी वाढ झाली आहे. (Petrol and diesel prices have Hike up again in the state)

परभणीत सलग चौथ्या दिवशी पेट्रोलच्या किमतीमध्ये वाढ झाली आहे. परभणीत काल पेट्रोलचे दर १००.४६ पैसे प्रति लिटर इतके होते. त्यात वाढ होत १००. ७० पैसे झाले तर डिझेलचा दर ९०.३७ पैसे इतके होते. त्यात २६ पैसे वाढ होत ९०.६३ पैसे झाले. पॉवर पेट्रोल १०४.११ पैसे झाले पेट्रोल आणि डिझेल सर्वांत महाग परभणीकराणा खरेदी करावे लागत आहे.

हे ही वाचा : उद्योग कामगारांची व्यवस्था दोन किलोमीटर परिसरात करु शकतात

परभणी पाठोपाठ यवतमाळमध्ये पेट्रोलचा दर हा  ९९.६१ रुपये तर डिझेलचा दर हा ८९.61 इतका आहे.  पेट्रोल आणि डिझेलमध्येही सातत्याने वाढ होत आहे. मात्र, ५ राज्यातील निवडूना बघता गेले काही दिवस पेट्रोल आणि डिझेलचे भाव स्थिर होते. ४ मे पासून पेट्रोलचे दर हे १.६२   पैशानी तर डिझेलचे दर हे १.४३ पैशानी वाढले आहेत. दरवाढीचा हा त्रास सर्वसामान्यांना जास्त होत आहे.

हे ही वाचा : शिवसेनेचे संपर्कप्रमुख आमदार तानाजी सावंत १९ महिन्यानंतर झाले अॅक्टिव्ह

सध्याच्या कोरोनाच्या काळात सर्वसामान्यांची आर्थिक आवक मंदावली असतानाच केंद्र सरकार मात्र दिलासा देण्याऐवजी त्यांच्या जीवनावश्यक वस्तूंमध्ये दरवाढ करून त्यांची गळचेपी करत आहे. कोरोना काळात अनेकांचे रोजगार हिरावल्या गेले. अशा स्थितीत केंद्र सरकारने पेट्रोल, डिझेलची आणि गॅस ज्या पद्धतीने दरवाढ केली आहे, ही क्रूर थट्टाच म्हणावी लागेल. पेट्रोल आणि डिझेलचे भाव स्थिर ठेवण्यासाठी यांना जीएसटीत आणले पाहिजे, अशी मागणी पांढरकवडा येथील गुरुकुल विद्यालयाचे प्राचार्य विजय देशपांडे यांनी केली आहे.  

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख