साताऱ्यात कोरोनाचा कहर सुरूच; सातारा, फलटण, खटाव तालुके हॉटस्पॉट 

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत सातारा जिल्ह्यात आज सर्वाधिक २६४८ बाधित रूग्ण आढळले आहेत. वाढणारे बाधितांचे आकडे लक्षात घेऊन आज मध्यरात्रीपासून जिल्हा प्रशासनाने कडक लॉकडाउन लागू केले आहे. गेल्या २४ तासांत तब्बल जिल्ह्यातील १४ हजार ३५६ जणांची कोरोना चाचणी करण्यात आली. यामध्ये २६४८ जण बाधित आढळले आहेत. जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी रेट १८.४५ टक्के इतका आहे.
साताऱ्यात कोरोनाचा कहर सुरूच; सातारा, फलटण, खटाव तालुके हॉटस्पॉट 
Corona's havoc continues in Satara; Satara, Phaltan, Khatav talukas hotspots

सातारा : सातारा जिल्ह्यात गेल्या २४ तासात आलेल्या अहवालानुसार २६४८ नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले असून 35 बाधितांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरूध्द आठल्ये (Dr. Anirutha Athalye) यांनी दिली आहे. कोरोना बाधितांचा (Corona Pendamic) आकडा वाढत असला तरी बाधितांची टक्केवारी १८.४५ टक्के आहे. सातारा (Satara), फलटण (Phaltan) आणि खटाव (Khatav) तालुक्यात सर्वाधिक रूग्ण असल्याने हे तीन तालुके कोरोनाचे हॉटस्पॉट (Hotspot) बनले आहेत. (Corona's havoc continues in Satara; Satara, Phaltan, Khatav talukas hotspots)

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत सातारा जिल्ह्यात आज सर्वाधिक २६४८ बाधित रूग्ण आढळले आहेत. वाढणारे बाधितांचे आकडे लक्षात घेऊन आज मध्यरात्रीपासून जिल्हा प्रशासनाने कडक लॉकडाउन लागू केले आहे. गेल्या २४ तासांत तब्बल जिल्ह्यातील १४ हजार ३५६ जणांची कोरोना चाचणी करण्यात आली.  यामध्ये २६४८ जण बाधित आढळले आहेत. जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी रेट १८.४५ टक्के इतका आहे.

गेल्या आठवडाभरापासून बाधितांची संख्या चाचणींच्या संख्येच्या तुलनेत कमी होत असल्याचे चित्र आहे. पण तरीही जिल्हा प्रशासनाने आठवडाभर कडक लॉकडाउनचा निर्णय घेतला आहे. सध्या सातारा, फलटण व खटाव हे तीन तालुके कोरोनाचे हॉटस्पॉट बनले आहेत. सातारा तालुक्यात ३७६, फलटण मध्ये ३६४ तर खटाव तालुक्यात ३१९ बाधित आढळले आहेत. महाबळेश्वर, जावळी व पाटणमध्ये कोरोना बाधितांचा आकडा कमी होऊन तो दोन अंकीवर आला आहे.

तालुकानिहाय कोरोना बाधितांची संख्या तर आजअखेर बाधित रुग्णांची संख्या कंसामध्ये अशी आहे : जावली 32 (6932), कराड 243 (20698), खंडाळा 172 (9131), खटाव 319 (13448), कोरेगांव 184 (12957), माण 140 (10085), महाबळेश्वर 17 (3850), पाटण 92 (6080), फलटण 364 (20647), सातारा 376 (33022), वाई 118 (10951 ) आहेत.  आजअखेर एकूण एक लाख 48 हजार 739 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आहेत. 

मृत्यू झालेल्या बाधितांची संख्या तर कंसात आजअखेर मृत्यू झालेल्या रुग्णांची तालुकानिहाय संख्या पुढील प्रमाणे आहे.  जावली 2(153),
कराड 6(599), खंडाळा 2 (124), खटाव 7 (373), कोरेगांव 3(295), माण 1(195), महाबळेश्वर 0(42), पाटण 5 (150), फलटण 0 (241), सातारा 6 (964), वाई 3 (289). आजअखेर जिल्ह्यात एकूण तीन हजार 425 कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in