मराठा आरक्षण संघर्ष मोर्चा पाच जूनला निघणारच..

समाजाने केवळ ऊस तोडणी, शेतातच काम करत आयुष्य काढायचे का असा सवालही त्यांनी केला.
Maratha Reservation news Beed
Maratha Reservation news Beed

बीड : राज्‍य सरकारच्‍या मनात पाप असल्याने समाजासाठी काहीही निर्णय घेत नाही. सारथी योजनेचे पैसे विद्यार्थ्यांना मिळत नाहीत, आरक्षण देणे हातात नाही तर निदान इतर सुविधा, सवलती तरी द्याव्यात, (Maratha Reservation Struggle Morcha will start on June 5, said mla vinayk mete) आदी विविध मागण्यांसाठी पाच जूनला मराठा मोर्चा निघणारच, अशी घोषणा शिवसंग्रामचे अध्यक्ष आमदार विनायक मेटे यांनी रविवारी (ता. २३) केली.

मराठा आरक्षण संघर्ष मोर्चा, लढा आरक्षणाचा असे मोर्चाला नाव देण्यात आले आहे. समाजाने केवळ ऊस तोडणी, शेतातच काम करत आयुष्य काढायचे का असा सवालही त्यांनी केला.

सनदी लेखापाल बी. बी. जाधव, अॅड. मंगेश पोकळे, जिल्हाध्यक्ष सुधीर काकडे, अॅड. महेश धांडे, विनोद इंगोले, सुहास पाटील, मनोज जाधव, प्रा. गोपाळ धांडे  यांच्या उपस्थितीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत मेटे यांनी मोर्चाची घोषणा केली.

आमदार मेटे म्‍हणाले, कपीलधार येथे मराठा मोर्चा संदर्भाने बैठक झाली. पाच जूनला सकाळी साडेदहा वाजता श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराज जिल्‍हा क्रीडा संकुल येथून मोर्चा निघून सुभाष रोड, अण्णाभाऊ साठे पुतळा, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा मार्गे जिल्‍हाधिकारी कार्यालयावर पोचले.

मास्‍क, सॅनिटायझरचा वापर, सोशल डिस्‍टनसिंग ठेऊन मोर्चा निघेल. मोर्चा दरम्‍यान वैद्यकीय सुविधाही उपलब्ध केल्‍या जातील. (The use of masks, sanitizers, social disinfection will lead to a march) शहर, तालुका व जिल्ह्याभरात मोर्चा संदर्भाने बैठका घेण्यासाठी समित्‍या स्‍थापन केल्‍या असून त्‍याची जबाबदारी सर्वांवर निश्चित करण्यात आली आहे. तसेच सीए बी.बी. जाधव यांच्‍यावर निधी संकलनाची जबाबदारी देण्यात आली असल्याचे मेटे यांनी स्पष्ट केले. 

मुक नव्हे, बोलका मोर्चा

यापूर्वी काढलेले मोर्चे हे मूक मोर्चे होते. हा मोर्चा बोलका, संघर्षशील, न्‍याय मागणारा असले. मोर्चाचे नेतृत्‍व सर्वजण करणार आहेत. सर्व पक्ष, गट, तट यांच्‍या पलिकडे जाऊन सर्वांना सोबत घेऊन हा मोर्चा काढला जाणार आहे. (Maratha leaders of all parties can join this march) सर्व पक्षाचे मराठा नेते या मोर्चात येऊ शकतात, त्‍यांचा आदर - सन्‍मान केला जाईल, असेही विनायक मेटे म्हणाले.

Edited By : Jagdish Pansare
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com