कोरोना रुग्णवाढीत घट मिळाल्याने दिलासा : लाॅकडाऊन शिथिल करण्याचे असे असणार धोरण

1 जूनपासून लाॅकडाऊन शिथिल करण्यासाठीचे धोरण टोपेंनी स्पष्ट केले.
कोरोना रुग्णवाढीत घट मिळाल्याने दिलासा : लाॅकडाऊन शिथिल करण्याचे असे असणार धोरण
rajesh tope11

जालना : राज्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाबाधित रुग्णाच्या संख्येत एप्रिलच्या तुलनेत मोठ्या प्रमाणात घट होत आहे. राज्यात दिवसभरात 26 हजार 672 नवे रुग्ण, 594 जणांचा मृत्यू झाला आहे. रोज नवे रुग्ण सापडण्याची संख्या ही कमाल 80 हजारांहून सुमारे 27 हजारावर आली आहे. परिणामी राज्यातील लाॅकडाऊन कधी रद्द होणार, याची चर्चा सुरू झाली आहे. (Maharshtra may lift lockdown slowly says Rajesh Tope)

मुंबई, पुणे, नाशिक आणि नागपूर या प्रमुख शहरांतली रुग्णांच्या संख्येत घट झाली असल्याने शहरी भागात दिलासा मिळाला आहे.  राज्याच्या आरोग्य यंत्रणेवरील ताण ही काही प्रमाणात कमी झाला आहे. मात्र ग्रामीण भागात सर्वाधिक रुग्ण आहेत. राज्यातील लाॅकडाऊन ३१ मे पर्यंत वाढविण्यात आला आहे. त्यानंतर काय होणार, याची आता उत्सुकता आहे. पुणे आणि मुंबई येथील व्यापाऱ्यांनी दुकाने उघडू द्या, अशी मागणी सरकारकडे केली आहे.

या पार्श्वभूमीवर जालन्यात बोलताना आरोग्यमंत्र्यांनी महत्त्वपूर्ण संकेत दिले. एक जूनपासून  काही जिह्यातील निर्बंध टप्प्याटप्प्यानं शिथिल केले जातील. कोरोना रुग्णांची संख्या नियंत्रणात असलेल्या जिल्ह्यांमधील निर्बंध हळूहळू मागे घेतले जातील,' अशी माहिती टोपे यांनी या वेळी बोलताना दिली आहे. टोपे यांच्या विधानानंतर राज्यात जिल्हानिहायच लाॅकडाऊन असण्याची शक्यता आहे.

राज्यात नाशिक आणि कोल्हापूर या जिल्ह्यातील लाॅकडाऊन शिथील झाला आहे. याउलट साताऱ्यात तो अधिक कडक करण्यात आला आहे.

  23 मे रोजीचे कोरोना अपडेट - पुणे  

- दिवसभरात 709 पाझिटिव्ह रुग्णांची वाढ.

- दिवसभरात 2324 रुग्णांना डिस्चार्ज.

- पुण्यात करोनाबाधीत 39 रुग्णांचा मृत्यू. 21 रूग्ण पुण्याबाहेरील.

- 1291 क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
- 4005 ऑक्सिजनवर उपचार घेणारे रुग्ण
- एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या - 465625

- पुण्यातील ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- 10676

- एकूण मृत्यू - 8007

-आजपर्यंतचे एकूण डिस्चार्ज - 446942

- आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी- 9066

.....................

सांगली कोरोना / म्युकर अपडेट :- 

जिल्ह्यात आज दिवसभरात 1126 कोरोना रुग्ण : 

म्युकर मायकोसीस :- एकूण 105 रुग्ण, आज आढळलेले 33 रुग्ण 

जिल्ह्यात आज कोरोनामुळे 24 रुग्णाचा मृत्यू : जिल्ह्यातील कोरोनाचा मृत्यूचा आकडा 3172 वर

ऍक्टिव्ह कोरोना रुग्ण संख्या 13380 वर : 

तर उपचार घेणारे 1589 जण आज कोरोना मुक्त 

आज अखेर बरे झालेल्या रुगणांची संख्या 92872 वर : 

जिल्ह्याची एकूण कोरोना रुग्णांची नोंद संख्या 109424 वर 

........................

कोरोना अपडेट वर्धा 

24 तासात झालेल्या चाचण्या- 2167 
  
आज दिवसभरात 215 पॉझिटिव्ह तर 6 मृत्यू आणि 459 कोरोनामुक्त

आज आयसोलेशन मध्ये असलेले एकूण - 1808

जिल्ह्यातील एकूण कोरोना बाधित संख्या - 46729
ऍक्टिव्ह पॉझिटिव्ह  3855
 एकूण कोरोनामुक्त - 41,654
एकूण मृत्यू  1225
इतर जिल्हा मृत्यू 0

..........................

वाशिम कोरोना अपडेट

जिल्ह्यात आज 13 रुग्णांचा मृत्यू ... 

नवे आढळले 270 रुग्ण... 

तर 656 जणांना देण्यात आला डिस्चार्ज... 

जिल्ह्यात आतापर्यंत आढळलेले एकूण पॉझिटिव्ह रुग्ण – 38241 

सद्यस्थितीत ऍक्टिव्ह रुग्ण – 3357 

आतापर्यन्त डिस्चार्ज दिलेले रुग्ण – 34463 

आतापर्यंत एकूण मृत्यू – 420

................................

Related Stories

No stories found.