बनावट नोटांचे ढेबेवाडी कनेक्शन; निगडी पोलिसांच्या कारवाईत सापडले धागेदोरे  - Connection of counterfeit notes in Patan taluka; Threads were found in the action of Nigdi police | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

शरद पवार आज अमित शहांच्या भेटीला, शहांकडे सहकार खात्याचा कारभार आल्यानंतरची पहिलीच भेट

बनावट नोटांचे ढेबेवाडी कनेक्शन; निगडी पोलिसांच्या कारवाईत सापडले धागेदोरे 

राजेश पाटील
बुधवार, 14 जुलै 2021

ढेबेवाडी खोऱ्याचे नाव यापूर्वीही काही वर्षांपूर्वी बनावट नोटा प्रकरणात चर्चेस आले होते. आता निगडित सापडलेल्या नव्या रॅकेटमुळे पुन्हा ढेबेवाडी चर्चेचा विषय बनली आहे. 

ढेबेवाडी : निगडी पोलिसांनी पर्दाफाश केलेल्या बनावट नोटांच्या आंतरराज्यीय रॅकेटचे धागेदोरे पाटण तालुक्यातील ढेबेवाडीपर्यंत पोचल्याने या विभागात खळबळ उडाली आहे. या प्रकरणातील संशयिताने ढेबेवाडी परिसरात बनावट नोटा खपविल्यात का? खपविल्या असल्यास त्या कुठे- कुठे फिरत आहेत, हे शोधण्याचे मोठे आव्हान पोलिस यंत्रणेसमोर असणार आहे. Connection of counterfeit notes in Patan taluka; Threads were found in the action of Nigdi police

वेगवेगळ्या घटना आणि गुन्हे यामुळे सतत चर्चेत राहणारे ढेबेवाडी खोरे आता बनावट नोटा प्रकरणामुळे चर्चेत आले आहे. निगडी पोलिसांनी बनावट नोटा तयार करणारे आंतरराज्य रॅकेट उघडकीस आणून याप्रकरणी सहा जणांना अटक केल्यानंतर गुन्ह्याचा एक धागा ढेबेवाडीपर्यंत पोचल्याने याप्रकरणी चर्चांना उधाण आले आहे. निगडी पोलिसांनी ताब्यात घेतलेला येथील संशयित तात्पुरता ढेबेवाडीत राहण्यास असला तरी तो मूळचा येथील नाही. 

हेही वाचा : बनावट नोटा प्रकरणाचे मालेगावपर्यंत धागेदोरे

गुन्ह्यात त्याचे नाव समोर आल्यानंतर स्थानिक पोलिसांना थांगपत्ता लागू न देता अत्यंत गुप्तपणे निगडी पोलिस त्यांच्यापर्यंत पोचल्याचे सांगण्यात येत आहे. संबंधित संशयिताचा ढेबेवाडीतील मुक्काम, येणे- जाणे व संपर्क याबाबी लक्षात घेता या परिसरात त्याने बनावट नोटा खपविल्या तर नाहीत ना? खपविल्या असल्यास त्या कुठे- कुठे फिरत आहेत, हे शोधण्याचे मोठे आव्हान यंत्रणेसमोर आहे. याबाबत ढेबेवाडी पोलिसांशी संपर्क साधला असता, बनावट नोटांमुळे फसवणूक झाल्याबाबत आमच्याकडे तक्रारी आलेल्या नाहीत. 

आवश्य वाचा : तुमचा निर्णय झाला असेल तर स्पष्ट सांगा...पवारांची काँग्रेस नेत्यांना गुगली

मात्र येथे राहणाऱ्या एका संशयिताचे नाव निगडी पोलिसांनी केलेल्या कारवाईतून समोर आल्याने माहिती घेत आहोत. आम्ही निगडी पोलिसांकडून अगोदर या गुन्ह्याची माहिती घेऊ आणि येथे राहणाऱ्या संशयिताने बनावट नोटा या परिसरात कुठे खपविलेल्या तर नाहीत ना? याचाही शोध घेऊ, असे सांगण्यात आले. ढेबेवाडी खोऱ्याचे नाव यापूर्वीही काही वर्षांपूर्वी बनावट नोटा प्रकरणात चर्चेस आले होते. आता निगडित सापडलेल्या नव्या रॅकेटमुळे पुन्हा ढेबेवाडी चर्चेचा विषय बनली आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख