बनावट नोटा प्रकरणाचे मालेगावपर्यंत धागेदोरे

बनावट नोटा प्रकरणाचे धागेदोरे मालेगावपर्यंत असल्याचे मध्य प्रदेश पोलिसांच्या प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. हरदा (मध्य प्रदेश) येथील पोलिस पथक मालेगाव येथे गेल्याचे वृत्त आहे.
Fake currancy
Fake currancy

रावेर : बनावट नोटा प्रकरणाचे धागेदोरे मालेगावपर्यंत (Fake currancy link up to malegaon) असल्याचे मध्य प्रदेश पोलिसांच्या प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. (MP state police came to conclusion in the investigation)  हरदा (मध्य प्रदेश) येथील पोलिस पथक मालेगाव (Harda police squad gone to malegaon) येथे गेल्याचे वृत्त आहे. 

दरम्यान, रावेरमधून अटक करण्यात आलेल्या संशयितांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे या प्रकरणाच्या चौकशीसाठी मध्य प्रदेशात स्थानिक पोलिस पथक पाठविण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती पोलिस निरीक्षक रामदास वाकोडे यांनी दिली. 

मध्य प्रदेशातील छिपाबड येथील पोलिसांनी रावेर येथील नोटा पुरवणारा मुख्य सूत्रधार शेख शकील याला येथे येऊन अटक केल्यानंतर खांडवा येथील अबरार मेहबूब, अय्युब इब्राहिम, अलयास शकील, मोहम्मद हुसेन ऊर्फ बाबू आणि मोहम्मद खालीद या पाच जणांना अटक केली होती. बेरोजगार युवकांना जाळ्यात ओढून शंभर रुपयांच्या नोटा मोठ्या प्रमाणावर चलनात आणण्याचा हा डाव होता. जवळपास सर्वजण या बनावट नोटा चलनात आणताना दहा रुपयांचे सामान विकत घेऊन ९० रुपये खिशात ठेवत असल्याचे आढळून आले आहे. बनावट नोटा चलनात आणण्यासाठी त्यांना प्रशिक्षण देण्यात आले असल्याचेही मध्य प्रदेश पोलिसांना आढळून आले आहे. एक लाख रुपयांच्या बदल्यात तीन लाख रुपयांच्या नकली नोटा चलनात आणण्यासाठी दिल्या जात असल्याचेही आढळून आले आहे. या पैशांच्या अमिषापोटी हे युवक या बेकायदेशीर कृत्याकडे ओढले गेल्याचे दिसून येत आहे. या प्रकरणी खंडवा आणि हरदा येथील जिल्हा पोलिस अधीक्षक तपासाकडे लक्ष ठेवून आहेत. 

दरम्यान, या प्रकरणी अधिक तपासासाठी शेख शकील यास ताब्यात घेण्यासाठी पोलिस निरीक्षक रामदास वाकोडे आणि तपासी अधिकारी पोलिस उपनिरीक्षक मनोज वाघमारे हे कागदपत्रांची पूर्तता करीत असून, मध्य प्रदेशात तपासाला जाण्यासाठी वरिष्ठांची परवानगी घेण्यात येत असल्याचे श्री. वाकोडे यांनी सांगितले. 

यापूर्वीही बनावट नोटा चलनात 
यापूर्वीही रावेर आणि मध्य प्रदेशच्या सीमेवर अनेकदा नकली नोटा चलनात आणल्यावरून पोलिसांत गुन्हे दाखल झाले आहेत. बऱ्हाणपूर- खंडवादरम्यान असलेल्या बोरगाव- कुमठी येथे एका महिलेला पाचशे रुपयांच्या नोटा चलनात आणताना अटक झाली होती. तिचाही रावेरशी संबंध असल्याचे वृत्त आहे. येथीलच खरेदी-विक्रीचा व्यवहार करणाऱ्या दोन मध्यस्थांनाही बनावट नोटा चलनात आणल्याप्रकरणी अटक झाली होती. दरम्यान, येथील शकील शेख या युवकाला त्याचा जिल्ह्यातीलच एक अतिशय जवळचा नातेवाईक या बनावट नोटा देत असल्याचे वृत्त असून, पोलिस त्या दिशेने तपास करीत आहेत.  
...

हेही वाचा...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com