तुमचा निर्णय झाला असेल तर स्पष्ट सांगा...पवारांची काँग्रेस नेत्यांना गुगली - ncp sharad pawar is upset congress leaders meet to sharad pawar | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

चिपळूणमध्ये : पुराचे पाणी अपरांत हाँस्पिटलमध्ये शिरले त्यामुळे वीज पुरवठा बंद झाल्यामुळे व्हेंटिलेटरवरील ८ रुग्ण दगावले.
महाड तालुक्यातील तळीये गावातील 32 घरांवर दरड कोसळली | दरडीत घरांचे मोठे नुकसान | 72 लोक बेपत्ता झाल्याचा अंदाज| पोलिसांचे पथक घटना स्थळाकडे रवाना

तुमचा निर्णय झाला असेल तर स्पष्ट सांगा...पवारांची काँग्रेस नेत्यांना गुगली

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 14 जुलै 2021

शरद पवार हे पटोलेंच्या विधानामुळे नाराज असल्याचे सांगितले जात आहे.

मुंबई : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या स्वबळाच्या नाऱ्यामुळे महाविकास आघाडी सरकारमधील वातावरण ढवळून निघाले आहे. काल काँग्रेसचे प्रभारी एच.के. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली काँग्रेसची महत्वाची बैठक झाली. या बैठकीत पटोलेंच्या या विधानावर चर्चा झाली. बैठकीनंतर एच.के. पाटील, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat)आणि बांधकाममंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांची भेट घेतली.  

नाना पटोले (Nana Patole) यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांवर पाळत ठेवल्याचा आरोप केल्यानंतर राज्याच्या राजकारणात जोरदार चर्चा सुरु झाली. विरोधकांनी हा मुद्दा उचलून आघाडी सरकावर टीका केली. यांच्यात समन्वय नाही. त्यामुळे हे कसले सरकार चालवणार, असा टोला विरोधकांनी लगावला.

स्वबळावर लढण्यासाठी तयार राहा, अशा पटोलेंच्या जाहीर वक्तव्यानंतर महाविकास आघाडीत (Mahavikas Aghadi) नाराजी नाट्य दिसून येत आहे. नाना पटोले (Nana Patole) यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांवर पाळत ठेवल्याचा आरोप केल्यानंतर राज्याच्या राजकारणात जोरदार चर्चा सुरु झाली. विरोधकांनी हा मुद्दा उचलून आघाडी सरकावर टीका केली. यांच्यात समन्वय नाही. त्यामुळे हे कसले सरकार चालवणार, असा टोला विरोधकांनी लगावला. 

राज्यात महाविकास आघाडी सरकार स्थापन करण्यात पुढाकार घेणारे शरद पवार (Sharad Pawar) हे पटोलेंच्या विधानामुळे नाराज असल्याचे सांगितले जात आहे. पवारांची नाराजी दूर करण्याची काँग्रेस नेत्यांनी प्रयत्न सुरु केले आहेत. या पार्श्वभूमीवर त्यांनी पवार यांची भेट घेतली. तुम्ही खरंच सगळ्या निवडणुका एकटेच लढणार का? तुमचा निर्णय झाला असेल तर ते स्पष्ट सांगा, असं शरद पवार काँग्रेच्या नेत्यांना म्हणाले आहेत.

''प्रत्येकाला आपला पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे. तो वाढवला देखील पाहिजे. मात्र ज्या पक्षांसोबत आपण सत्तेत आहोत ते पक्ष दुखावले जाणार नाहीत, सरकारमध्ये कटुता येणार नाही. अशा गोष्टी आपण टाळायला हव्यात,'' असे पवार यांनी काँग्रेस नेत्यांना सांगितले असल्याचं वृत्त आहे.

पुढील सर्व निवडणुका स्वबळावर लढण्याचा तुमचा निर्णय वरिष्ठ पातळीवर झाला असेल तर मला त्याविषयी काहीच बोलायचं नाही. मुंबई काँग्रसचे अध्यक्ष आणि प्रदेशाध्यक्ष यांना आपण यासंदर्भातले अधिकार दिलेत? दिले असतील तर तसंही स्पष्ट सांगा, म्हणजे आम्ही तुमच्या वक्तव्याकडे लक्ष देणार नसल्याचं पवार म्हणालेत 
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख