अलमट्टी धरणाच्या उंची वाढविण्यास चंद्रकांतदादांचाही विरोध

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सांगलीत बोलताना अलमट्टी धरणाची उंची वाढवणे हे महाराष्ट्राला विशेष करून सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यांना घातक आहे.अलमट्टीची उंची वाढवण्यास करारात परवानगी नाही.
Chandrakantdada also opposes raising the height of Almatti dam
Chandrakantdada also opposes raising the height of Almatti dam

सांगली : कर्नाटक सरकारने अलमट्टी धरणाची उंची पाच मीटरने वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी धरणाची उंची वाढल्यास सांगली आणि शिरोळला धोका निर्माण होणार असल्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे महाराष्ट्र शासनाने त्याला विरोध करावा असे आवाहन केले आहे. Chandrakantdada also opposes raising the height of Almatti dam

अलमट्टी धरणाची उंची वाढवण्यासाठी कर्नाटक सरकार प्रयत्नशील आहे. याबाबतचा अध्यादेश लवकरच काढण्यात येणार असल्याची घोषणा कर्नाटक सरकारने केली आहे. मात्र, अलमट्टी धरणाची उंची वाढवली तर त्याचा परिणाम महाराष्ट्रावर विशेष करून अलमट्टीला लागूनच असलेल्या सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यावर होणार आहे. त्यामुळे धरणाची उंची वाढवण्यास विरोध होत आहे. 

या धरणाची उंची सध्या 519 मीटर इतकी असून या ठिकाणी 135 टीएमसी पाणीसाठा करण्याची क्षमता आहे. मात्र आणखी पाच मीटरने धरणाची उंची वाढविली तर हाच पाणीसाठा १६० टीएमसी पर्यंत वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे सांगली आणि कोल्हापूर या दोन जिल्ह्यांना याचा फटका बसू शकतो अशी एक चर्चा जोर धरत आहे. 

कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांनी नुकतीच अलमट्टी धरणाची उंची पाच मीटरने वाढविण्याबाबत घोषणा केली असून त्याचा अध्यादेश लवकरच काढण्यात येईल असेही कर्नाटक सरकारने जाहीर केले आहे. त्याला महाराष्ट्र शासन काय उत्तर देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

दरम्यान, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सांगलीत बोलताना अलमट्टी धरणाची उंची वाढवणे हे महाराष्ट्राला विशेष करून सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यांना घातक आहे. अलमट्टीची उंची वाढवण्यास करारात परवानगी नाही. त्यामुळे महाराष्ट्र शासनाने या निर्णयाला विरोध करावा. याआधीही अलमट्टी धरणाची उंची वाढवण्यात आली ती कर्नाटकने दाबून वाढवली आहे. आता पुन्हा या धरणाची उंची वाढविल्यास सांगली आणि शिरोळ यांना महापुराचा धोका होऊ शकतो असा इशारा चंद्रकांत पाटील यांनी दिला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com