शिवसेना खासदाराच्या जावयाच्या थिएटर मालकांशी `वाटा`घाटी : आशिष शेलारांनी सांगितली 'अंदर की बात'

हा वाटघाटीचा धंदा बंद करा.
 Ashish Shelar, Uddhav Thackeray .jpg
Ashish Shelar, Uddhav Thackeray .jpg

मुंबई : ठाकरे सरकारने निर्बंधाचा नवीन धंदा सुरू केलेला आहे. वाटा मिळाला की निर्बंध शिथिल होतात. जिथे घाटा आहे तिथे निर्बंध कडक राहतात म्हणून रेस्टॉरंटवाले, बारवाले, भेटले "वाटघाटी" झाल्या वाटा मिळाला की, निर्बंधात शिथिलता दिली जाते, असा आरोप भाजप (BJP) नेते आमदार आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी केला. (BJP leader Ashish Shelar criticizes Shiv Sena) 

ते मुंबईमध्ये पत्रकार परिषदेत बोलत होते. तर दुसरीकडे घाट्यात असलेले मराठी कलावंत, नाटक कलावंत, मराठी लोक कलावंत, धुप कापूर विकणारे हे घाट्यात आहेत. वाटाघाटी करु शकत नाहीत. वाटा देऊ शकत नाहीत म्हणून त्यांच्यावर निर्बंध लादले गेले आहेत. त्यांची उपासमार सुरु आहे. हा वाटघाटीचा धंदा बंद करा, आता गणेशोत्सव, नवरात्र मंडळांसोबत पण शिवसेना वाटघाटी करणार का? असा सवाल शेलार यांनी केला. 

राज्यातले थिएटर सुरू करण्यासाठी सत्ताधारी महाविकास आघाडीतील एक राज्यसभा सदस्यांचा जावई सरकारच्यावतीने वाटाघाटी करतो आहे. वाटाघाटी करा मग निर्बंध शिथिल करु असा धंदा सुरू आहे. शिवसेनेच्या राज्यसभा सदस्याच्या जावयाने हे धंदे बंद करावे, अन्यथा आम्ही नाव जाहीर करु. असा इशाराही यावेळी शेलार यांनी दिला. त्यामुळे शेलार यांनी सांगितलेले राज्यसभा सदस्य कोण अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे.  

मंगळवारी दिवसभर गोविंदाला नोटीस काय, धरपकड काय, बलाचा वापर काय, अटक काय, या सगळ्या गोष्टीचा काय महाराष्ट्रात आणि मुंबईत घडल्या, जणू काही सुलतानी पद्धतीचा कारभार सुरु होता. म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आम्ही आठवण करून देतो, ज्यावेळी सचिन वाझेचा प्रश्न सभागृहात आम्ही मांडला, करोडोंची वसुली केल्यानंतर ज्यावेळी आम्ही प्रश्न उपस्थित केला, तर तुम्ही म्हणाला होतात की, सचिन वाझे लादेन आहे काय? आज आमचा सवाल आहे तुम्हाला, हे गोविंदा काय लादेन आहेत काय? ज्या पद्धतीने बलाचा वापर करून, अटक करून, धरपकड करून, नोटीस देऊन, केसेस टाकताय म्हणून हा सवाल आम्ही तुम्हाला विचारतोय, असेही शेलार म्हणाले.  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com