किरीट सोमय्या यांच्या यादीत आणखी एक मंत्री : आता ईडीच्या रडारवर जितेंद्र आव्हाड

सोमय्या यांनी दोन दिवसांपूर्वीच महाविकास आघाडी सरकारमधील 11 जण घोटाळेबाज असल्याचे सांगत ते ईडीच्या रडावर असल्याचा इशारा दिला होता.
किरीट सोमय्या यांच्या यादीत आणखी एक मंत्री : आता ईडीच्या रडारवर जितेंद्र आव्हाड
kirit somayya.jpg

मुंबई ः मुंबईसह राज्यातील पाच महापालिकांची निवडणूक जवळ आली आहे. राज्यातील राजकारण तापू लागले आहे. भाजपचे खासदार किरीट सोमय्या यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व मंत्री छगन भुजबळ यांना सात वर्षांची शिक्षा होईल व शिवसेनेच्या खासदार भावना गवळी याही लवकरच तुरूंगात जातील, असे काही दिवसांपूर्वी सांगितले होते. तर ट्विट करून खासदार भावना गवळी यांनी 100 कोटी रूपयांचा घोटाळा केल्याचा आरोप केला होता. त्यानुसार खासदार भावना गवळी यांच्या मागे ईडीची चक्रे लागली आहेत.

सोमय्या यांनी दोन दिवसांपूर्वीच महाविकास आघाडी सरकारमधील 11 जण घोटाळेबाज असल्याचे सांगत ते ईडीच्या रडावर असल्याचा इशारा दिला होता. या यादीत गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांचाही समावेश करत ही यादी 12 जणांची झाली असल्याचे त्यांनी सांगितले. 

हेही वाचा...

खासदार सोमय्या यांनी आज मंत्री छगन भुजबळ यांच्यावरील आरोपा संदर्भात मुंबईत पत्रकार परिषद घेतली. त्यात खासदार सोमय्या म्हणाले, मंत्री भुजबळ यांनी मोठा घोटाळा केला आहे. छगन भुजबळ यांनी नामी आणि बेनामी मालमत्ता जाहीर करावी. गेल्या आठवड्यात 130 कोटी ची मालमता आयकर विभागाने जप्त केली. त्यावेळी भुजबळांनीच आम्हाला अडविले. 

राज्य सरकारने सांगाव आर्म स्ट्रॉंग एनर्जी, आर्म स्ट्रॉंग इन्फ्रा या कंपनीकडे पैस आला कुठून? ही कंपनी चालविणारे लोक बनावट आहेत. मुंबईतील सांताक्रूज येथे भुजबळांनी बांधलेल्या 9 मजली महालाची मी स्वतः जाऊन पाहणी करणार आहे. या पाहणीसाठी मी शनिवारी जाईल. या कंपनीतील बनावट लोकांत सत्यवान केसकर हे एक आहेत. ते भुजबळांचे सहकारी आहेत. गिरणा शुगरमिल ही भुजबळांची दुसरी बेनामी मालमत्ता आहे. 

उद्धव ठाकरे आणि शरद पवार याना माझं आव्हान आहे की, त्यांनी 9मजली इमारतीचा मालक कोण हे त्यांनी सांगावं. अनिल परब विरोधात मीच पहिली तक्रार केली होती. त्याची सुनावणी सध्या सुरू आहे. बजरंग खरमाते याची ईडीकडे चौकशी सुरू आहे. उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांनी अनिल देशमुखांना लावून ठेवलं आहे. ईडीने प्रताप सरनाईकांची मालमत्ता जप्त केली आहे. 

ईडीच्या कारवाईवर महाविकास आघाडी टीका करत आहे. मात्र हेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे भाजप बरोबर युतीत असताना त्यांनी ईडीच्या कारवाईचे कौतूक केले होते. आता टीका करत आहेत. ईडीच्या लिस्टमधील 12वा खेळाडू जितेंद्र आव्हाड आहे, असे म्हणत खासदार सोमय्या यांनी सूचक वक्तव्य केले आहे. त्यामुळे मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या मागे ईडीचे शुक्लकाष्ट लागणार अशी चर्चा महाराष्ट्रभर सुरू झाली आहे. 

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in