बदलीवरून पोलिसाचा आत्‍महत्‍येचा प्रयत्न; बेशुध्द अवस्थेत हॉटेलात आढळला...  

हा व्‍हिडिओ व्‍हायरल झाल्‍यानंतर सातारा शहर वाहतूक शाखेचे सहाय्‍यक निरीक्षक विठ्ठल शेलार, कर्मचारी योगेश महाडीक, श्री. वाघमारे यांनी श्री. माळी यांचा शोध सुरू केला
बदलीवरून पोलिसाचा आत्‍महत्‍येचा प्रयत्न; बेशुध्द अवस्थेत हॉटेलात आढळला...  
Attempted suicide by police on transfer; Found unconscious in hotel ...

सातारा : अन्‍यायकारक बदली केल्‍याचा आरोप करत सातारा शहर वाहतुक शाखेतील पोलिस चालक विजय शंकरराव माळी (वय ५२, रा. पंताचा गोट, रविवार पेठ, सातारा) यांनी आत्‍महत्‍या करत असल्‍याचा व्‍हिडिओ सोशल मीडियावर व्‍हायरल केला होता. हा व्‍हिडिओ व्‍हायरल झाल्‍यानंतर पोलिस कर्मचार्‍यांनी त्यांचा शोध सुरू केला. त्यावेळी श्री. माळी यवतेश्‍‍वर येथील एका हॉटेलात अर्धवट बेशुध्‍द अवस्थेत आढळले. श्री. माळी यांना उपचारासाठी जिल्‍हा शासकीय रुग्‍णालयात दाखल केले असून येथे त्‍यांच्‍यावर सध्या उपचार सुरु आहेत. Attempted suicide by police on transfer; Found unconscious in hotel ...
 
सातारा शहर वाहतुक शाखेत विजय माळी हे चालक म्‍हणून कार्यरत आहेत. आठवड्यापूर्वी पोलिस अधीक्षक अजयकुमार बन्‍सल यांनी बदली निकषास पात्र असणार्‍या कर्मचार्‍यांची माहिती प्रभारी अधिकार्‍यांकडुन मागवली होती. ही माहिती मिळाल्‍यानंतर श्री. बन्‍सल यांनी सर्वच कर्मचार्‍यांशी चर्चा करत बदली प्रक्रिया पूर्ण केली. बन्‍सल यांनी जाहीर केलेल्‍या यादीनुसार माळी यांची म्‍हसवड पोलिस ठाण्‍यात बदली करण्‍यात आली होती.

सदर बदली ही अन्‍यायकारक असून मी त्‍याबाबत श्री. बन्‍सल यांची भेट घेतली होती. भेटीवेळी त्‍यांना मी माझ्‍या कौटुंबिक जबाबदार्‍या, अडचणींची माहिती देत शाहूपुरी अथवा डॉग स्‍क्‍वॉड येथे नेमणुक देण्‍याची विनंती केली होती. या विनंतीनंतरही श्री. बन्‍सल यांनी त्यांना म्हसवड येथेच हजर होण्याची सूचना केली. त्यावरून श्री. माळी यांनी सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरला केला. यामध्ये त्यांनी म्हटले की, ''कोणाची तरी मर्जी राखण्‍यासाठी माझी बदली म्‍हसवड येथे केली असून ती अन्‍यायकारक असून त्यामुळे मी आत्‍महत्‍या करत आहे,'' असे त्यांनी व्हिडीओत म्हटले होते.

हा व्‍हिडिओ व्‍हायरल झाल्‍यानंतर सातारा वाहतूक शाखेचे सहाय्‍यक निरीक्षक विठ्ठल शेलार, कर्मचारी योगेश महाडीक, श्री. वाघमारे यांनी श्री. माळी यांचा शोध सुरू केला. शोधादरम्‍यान, माळी यवतेश्‍‍वर येथील एका हॉटेलात असल्‍याचे त्‍यांना समजले. यानुसार त्‍या ठिकाणी जाऊन अर्धवट शुध्‍दीत असणार्‍या श्री. माळी यांना त्‍यांनी उपचारासाठी जिल्‍हा शासकीय रुग्‍णालयात दाखल केले.

याठिकाणी प्राथमिक उपचार केल्‍यानंतर श्री. माळी यांना पुढील उपचारासाठी खासगी रुग्‍णालयात नेण्‍यात आले. श्री. माळी यांनी विषारी औषध घेतल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. त्‍यासाठीचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्‍यात आले आहेत. याची प्राथमिक नोंद सातारा तालुका पोलिस ठाण्‍यात झाली असून त्‍यांच्‍याकडून अधिक तपास सुरू करण्‍यात आला आहे. 
 

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in