पुणे, सातारा, सांगलीसह या अकरा जिल्ह्यांना दिलासा नाहीच; निर्बंध कायम राहणार

नव्या नियमावलीनुसार सोमवार ते शुक्रवार रात्री ८ वाजेपर्यंत सर्व दुकाने सुरु ठेवण्यास परवानगी देण्यात आल्याने दुकानदार आणि व्यापारी वर्गाला दिलासा मिळणार आहे.
Maharashtra Govt issues new break the chain order
Maharashtra Govt issues new break the chain order

मुंबई : मागील काही दिवसांपासून राज्यातील कोरोना (Covid-19) रुग्णांची संख्या कमी होत असल्याने लॉकडाऊनचे निर्बंध शिथील करण्याचा मोठा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. त्यानुसार राज्यातील 11 जिल्हे वगळून इतर जिल्ह्यांमधील निर्बंध शिथील करण्याचा आदेश सोमवारी जारी करण्यात आला. त्यानुसार या जिल्ह्यांमध्ये अत्यावश्यक सेवेसह इतर सर्व दुकानं व मॉल रात्री आठ वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. (Maharashtra Govt issues new break the chain order) 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली मागील आठवड्यात टास्क फोर्स आणि आरोग्य विभागाच्या बैठकीत निर्बंध शिथील करण्याबाबतचा निर्णय घेण्यात आला. राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये सध्या तिसऱ्या स्तरातील निर्बंध आहेत. पण मागील काही दिवसांपासून अनेक जिल्हयांमधील कोरोनाची रुग्ण संख्या कमी होत आहे. त्यामुळे या जिल्ह्यांमधील निर्बंध शिथील कमी करण्याची मागणी होत होती. त्याअनुषंगाने या बैठकीत महत्वाचे निर्णय घेण्यात आले. त्यानुसार याबाबतचा आदेश सोमवारी काढण्यात आला.

नव्या नियमावलीनुसार सोमवार ते शुक्रवार रात्री ८ वाजेपर्यंत सर्व दुकाने सुरु ठेवण्यास परवानगी देण्यात आल्याने दुकानदार आणि व्यापारी वर्गाला दिलासा मिळणार आहे. पण पुण्यासह अन्य जिल्हयांमध्ये दुकानदार व व्यापाऱ्यांनी दुकानांच्या वेळा वाढवण्याची जोरदार मागणी केली होती. काही जिल्ह्यांतील व्यापाऱ्यांनी सरकारला अल्टीमेटमही दिला होता. सरकारच्या निर्बंधाला न जुमानता दुकानं उघडण्याचा इशारा त्यांनी दिल्यानंतर हे निर्बंध शिथील कऱण्यात  आले आहेत. पण त्यामध्ये पुण्यासह सांगली, सातारा, कोल्हापूरसह इतर 11 जिल्ह्यांचा समावेश नसल्याने या जिल्ह्यांमधील रोष वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. 

कोणत्या जिल्ह्यांमध्ये निर्बंध कायम राहणार?

निर्बंध कायम राहणाऱ्या 11 जिल्ह्यांमध्ये पुण्यासह सांगली, कोल्हापूर, सोलापूर, सातारा, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पालघर, अहमदनगर आणि बीड या जिल्ह्यांचा समावेश आहे. या जिल्ह्यांतील रुगसंख्या आणकी वाढल्यास लॉकडाऊनचे निर्बंध आणखी कडक केले जातील. त्याचप्रमाणे मुंबई, मुंबई उपनगर व ठाणे जिल्ह्यांबाबत स्थानिक प्रशासनाकडून निर्बंध शिथील करण्याबाबतचा निर्णय घेतला जाईल. त्यामुळं सोमवारच्या आदेशात या जिल्ह्यांचा समावेश करण्यात आलेला नाही. 

शिथील करण्यात आलेले निर्बंध (14 जिल्हे वगळून) :

- सोमवार ते शुक्रवार रात्री ८ वाजेपर्यंत सर्व दुकानं खुली ठेवण्यास मान्यता.
- शनिवारीही अनलॉक, दुपारी ३ पर्यंत सर्व दुकानं खुली ठेवता येणार. 
- दुकानांसोबत मॉलही खुले होणार.
- रविवारी फक्त अत्यावश्यक सेवेतील दुकाने सुरू
- सर्व खासगी आणि शासकीय कार्यालयं ही संपूर्ण क्षमतेने खुली राहणार
- सर्व उद्याने, मैदाने खुली राहणार 
- हॉटेल्स सोमवार ते शुक्रवारपर्यंत दुपारी ४ पर्यंत ५० टक्के क्षमतेने खुली राहतील. इतर वेळेत पार्सल सेवा सुरू राहील. 
- ब्युटी पार्लर, स्पा, हेअर सलून, जिम, योगा क्लासेस सोमवार ते शुक्रवार रात्री ८ पर्यंत, शनिवारी दुपारी ३ पर्यंत ५० टक्के क्षमतेने खुले ठेवण्यास परवानगी.  
- सिनेमागृह, मस्टिप्लेक्सना अद्याप परवानगी नाही.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com