रक्षकच झाला भक्षक; फौजदाराविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल 

आपल्या पत्नीला घटस्फोट देऊन तुझ्याशी लग्न करतो, असे या तरुणीला सांगून तिच्याशी जवळीक केली.
 Rape case filed against Assistant Police Inspector .jpg
Rape case filed against Assistant Police Inspector .jpg

पिंपरी : एका विवाहित महिलेला लग्नाचे आमिष दाखवून तिच्याशी शारीरिक सबंध प्रस्थापित करणाऱ्या एका विवाहित सहाय्यक पोलिस निरीक्षकाविरुद्ध (एपीआय) (Assistant Police Inspector) बलात्काराचा गुन्हा पिंपरी-चिंचवडमधील सांगवी पोलिस ठाण्यात काल (ता. २ ऑगस्ट ) नोंद झाला. नमूद करण्याजोगी बाब म्हणजे या पोलिस अधिकाऱ्याविरोधात गेल्यावर्षी या तरुणीने सातारा येथे सुद्धा असाच गुन्हा दाखल केलेला आहे. (Rape case filed against Assistant Police Inspector) 

शिवाजी बबन भोसले असे या एपीआयचे नाव असून तो सध्या सातारा ग्रामीण पोलिस मुख्यालयातील नियंत्रण कक्षात नेमणुकीस आहे. साताऱ्यातही त्याच्याविरुद्ध याच तरुणीने गेल्यावर्षी अशीच तक्रार दिली असल्याचे सांगवी पोलिस ठाण्याचे निरीक्षक रंगनाथ उंडे यांनी सांगितले. मात्र, तो सध्या तिकडे कुठे राहत आहे, हे माहित नसल्याचे पोलिसांनी सांगितले. दरम्यान, सातारा तसेच पिंपरी-चिंचवडमध्ये सांगवी पोलिस ठाण्याच्या हद्दीत पिंपळे गुरव येथे हा गुन्हा घडलेला असल्याने दोन्ही ठिकाणी गुन्हे दाखल झाल्याचे समजले आहे. 

त्यामुळे साताऱ्याच्या गुन्ह्यात काय कारवाई झाली, हे पाहूनच पिंपरी-चिंचवड तथा सांगवी पोलिस आपली तपासाची तथा कारवाईची दिशा ठरवणार आहेत. त्यामुळे तूर्त आरोपीच्या अटकेसारखी कारवाई हा गंभीर गुन्हा असला, तरी लगेच होण्याची शक्यता नाही. फिर्यादी महिलेची वैद्यकीय तपासणी तसेच पुरावे गोळा केल्यानंतर कारवाई केली जाईल, असे सांगवी पोलिसांनी सांगितले.

भोसले इकडे नियुक्तीला असताना फिर्यादी महिला नवऱ्याविरुद्ध तक्रार देण्यासाठी पोलिस ठाण्यावर गेली असता त्यांची ओळख झाली. नंतर त्याने आपण आपल्या पत्नीला घटस्फोट देऊन तुझ्याशी लग्न करतो, असे या तरुणीला सांगून तिच्याशी जवळीक केली. एवढेच नाही, तर विश्वास बसावा म्हणून तिच्याशी गांधर्व पद्धतीने विवाह केला. पिंपळे गुरव व सातारा येथेही त्याने तिच्याशी वरील आमिषाने शारिरीक सबंध प्रस्थापित केले. मात्र, त्याने पत्नीला घटस्फोट दिला, तर नाहीच. तसेच या तरुणीलाही नांदायला नेले नाही. उलट तिला धमकी देत मारहाण केली. त्यामुळे तिने इथेही पोलिसांत धाव घेतली. 

Edited By - Amol Jaybhaye 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com