अनैसर्गिक आघाडीच्या कृतीशुन्यतेमुळे मुंबईत पावसाचे बळी..... - Rain falls in Mumbai due to inaction of unnatural front says BJP leader Chitra Wagh | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख यांचे निधन...
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोल्हापुरात दाखल..पुरग्रस्त भागाची पाहणी

अनैसर्गिक आघाडीच्या कृतीशुन्यतेमुळे मुंबईत पावसाचे बळी.....

सरकारनामा ब्यूरो
सोमवार, 19 जुलै 2021

२० वर्षात २०० हून अधिक नागरिकांचा दरड दुर्घटनेत जीव गेल्याची कबुली स्वतः राऊतांनी दिलीये. परंतू त्या झोपडपट्ट्यांच्या पुनवर्सनाला शिवसेना तयार नाहीत.

मुंबई : मुंबईच्या पावसात गेलेले ३० बळी हे अनैसर्गिक पावसाने नाही तर अनैसर्गिक आघाडीच्या कृतीशुन्यतेमुळे गेलेले आहेत. शिवसेने झोपट्टीवासियांच्या पूनर्वसनासाठी शिवसेनेने वितभर जागा देण्याचे धारिष्ठ्य दाखवलेले नाही. अनैसर्गिक पावसाच्या पदराआड दडून मुंबई मनपा कशी नामानिराळी आहे, हे सिध्द करण्यात राऊत व्यक्त आहेत, अशी टीका भाजपच्या प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनी केली आहे. Rain falls in Mumbai due to inaction of unnatural front says BJP leader Chitra Wagh

मुंबईतील पावसात झोपडपट्टीतील नागरीकांचे जे बळी गेले आहेत, ते शिवसेनेच्या कृतीशुन्यतेमुळे गेल्याची टीका सौ. वाघ यांनी केली आहे. त्या म्हणाल्या, संजय राऊत यांचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे कारण त्यांनी पावसामुळे दरडी कोसळून मृत पावलेल्या मुंबईकरांसाठी त्यांनी यावेळेस केंद्र सरकारला जबाबदार धरलं नाही..

हेही वाचा : कर्नाटकात वारे फिरले...मुख्यमंत्री येडियुरप्पांना पाठिंब्यासाठी काँग्रेस आमदार मैदानात

पण मुंबईत गेलेले एकूण ३० बळी 'अनैसर्गिक पावसाने' नाहीत. तर अनैसर्गिक आघाडीच्या कृतीशुन्यतेमुळं गेलेत आहेत. मुंबईतल्या डोंगर आणि टेकड्यांबद्दल राऊतांना आज आग्रलेखात पाझर फुटत असला तरी त्याच झोपडपट्टीवाल्यांच्या पुनवर्सनासाठी शिवसेनेनं वितभर जागा देण्याचही धारिष्ठ्य दाखवलं नाही. 

आवश्य वाचा : मी संन्यास घेईल हे जाणीवपूर्वक बोललो होतो!

२० वर्षात २०० हून अधिक नागरिकांचा दरड दुर्घटनेत जीव गेल्याची कबुली स्वतः राऊतांनी दिलीये. परंतू त्या झोपडपट्ट्यांच्या पुनवर्सनाला शिवसेना तयार नाहीत. नियोजन शुन्यता आणि कॉंट्रॅक्टर बिल्डर्सच्या घरभरु धोरणांच बील आता राऊत पाऊसावर फाडत आहेत. अनैसर्गिक पवासाच्या पदरा आड दडून मुंबई मनपा कशी नामानिराळी आहे, हे सिद्ध करण्यात राऊत व्यस्त आहेत, अशी टीका भाजपच्या प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनी केली आहे. 
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख