आमदार मोनिका राजळे, चंद्रशेखर घुले यांच्यात कलगीतुरा

ताजनापूर उपसा सिंचन योजनेच्या दुसऱ्या टप्प्याच्या कामासाठी राज्य सरकारने अर्थसंकल्पात चाळीस कोटी सत्तेचाळीस लाख रुपयांची तरतूद केली आहे. मात्र त्यासाठीच्या श्रेयवादावरून भाजपच्या आमदार मोनिका राजळे व राष्ट्रवादीचे माजी आमदार चंद्रशेखर घुले यांच्यात श्रेयवादावरून कलगीतुरा रंगू लागला आहे.
monika rajale and chandrakant ghule exchange words
monika rajale and chandrakant ghule exchange words

शेवगाव : तालुक्याच्या पूर्व भागातील शेतीला वरदान ठरणाऱ्या ताजनापूर उपसा सिंचन योजनेच्या दुसऱ्या टप्प्याच्या कामासाठी राज्य सरकारने अर्थसंकल्पात चाळीस कोटी सत्तेचाळीस लाख रुपयांची तरतूद केली आहे. मात्र त्यासाठीच्या श्रेयवादावरून भाजपच्या आमदार मोनिका राजळे व राष्ट्रवादीचे माजी आमदार चंद्रशेखर घुले यांच्यात श्रेयवादावरून कलगीतुरा रंगू लागला आहे.

तालुक्याचा लोकप्रतिनिधी भाजपचा असल्याने, तर राष्ट्रवादी काँग्रेस राज्यात सत्ताधारी असल्याने रखडलेला हा प्रकल्प मार्गी लावण्यासाठी दोन्ही पक्षाकडून निधीसाठी प्रयत्न केल्याचे दावे-प्रतिदावे केले आहे.

भाजप आमदार राजळे यांचे प्रयत्न
याबाबत आमदार मोनिका राजळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकल्पासाठी अर्थसंकल्पामध्ये 70 कोटी रूपयांची मागणी विधानसभेत केली होती, त्या अनुषंगाने शासनाने 40 कोटी 47 लक्ष रूपयांची तरतुद केली आहे. आत्तापर्यंत योजनेसाठी 81 कोटी खर्च करून वितरण कुंड, यांत्रिकी पंपाची उभारणी या घटकांची कामे पूर्ण झालेली आहेत. परंतु वितरण व्यवस्थेची कामे होणे बाकी आहेत. या निधीतून ही कामे मार्गी लागणार आहेत. पूर्व भागाच्या 20 गावांतील 6960 हेक्टर क्षेत्रास त्याचा लाभ होणार आहे. 

राष्ट्रवादीचाही दावा
राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने तालुकाध्यक्ष कैलास नेमाने व राष्ट्रवादी युवकचे जिल्हा कार्याध्यक्ष  संजय कोळगे यांनीही पत्रकार परिषद घेऊन अशी माहिती दिली की, मागील सरकारच्या काळात रखडलेल्या या प्रकल्पासाठी निधीची तरतूद करावी, यासाठी गेल्या महिन्यात माजी आमदार चंद्रशेखर घुले व पंचायत समितीचे सभापती डॉ. क्षितिज घुले यांनी लाभधारक गावातील शेतकऱ्यांसह राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांची भेट घेतली होती. 

या वेळी झालेल्या बैठकीत पाटील यांनी जलसंपदा विभागाचे कार्यकारी संचालक एन. व्ही. शिंदे, नाशिक विभागाचे मुख्य अभियंता के. डी. कुलकर्णी, अधीक्षक अभियंता अरुण नाईक, कार्यकारी अभियंता काशीनाथ मासाळ यांच्याशी चर्चा करून प्रकल्पाच्या अडचणी व निधी उपलब्धता, निविदा प्रक्रिया या संदर्भात सविस्तर चर्चा केली होती. 
त्यानुषंगाने या प्रकल्पासाठी वित्तमंत्री अजित पवार यांनी राज्याच्या अर्थसंकल्पात तब्बल चाळीस कोटी सत्तेचाळीस लाख रुपयांची तरतूद केली आहे. यासाठी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे,पालकमंत्री हसन मुश्रीफ, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख, उर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी विशेष सहकार्य केल्याचे कोळगे यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com