Ahmednagar Name Change: अहमदनगरचे नामांतर अहिल्यादेवी होळकर करा; आता वंशजांनीच केली मागणी...

Ahmednagar News: अहमदनगर जिल्ह्याच्या नामांतराची मागणी जोर धरू लागली आहे.
Ahmednagar Name Change
Ahmednagar Name ChangeSarkarnama

Ahmednagar Name Change: औरंगाबादचे छत्रपती संभाजीनगर आणि उस्मानाबादचे नामांतर धाराशीव' या जिल्ह्यांचं नामांतर झाल्यानंतर आता अहमदनगर (Ahmednagar) जिल्ह्याच्या नामांतराची मागणी जोर धरू लागली आहे. विशेष म्हणजे यावेळी थेट अहिल्यादेवी होळकर यांच्या वंशजांनीच नामांतराची मागणी केली आहे. स्वप्निलराजे होळकर यांनी अहमदनगरचे नामांतर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर करावे, अशी मागणी केली आहे. (Rename Ahmednagar to Ahilya Devi Holkar; Now the descendants have demanded...)

महाराज यशवंतराव होळकर यांचे वंशज स्वप्निलराजे होळकर यांच्या नेतृत्त्वात महाराज यशवंतराव होळकर यांची शौर्ययात्रा पुणे ते इंदौर काढण्यात आली . यावेळी बोलताना त्यांनी ही मागणी केली आहे. पुणे ते इंदौरपर्यंत काढण्यात आलेल्या यात्रेतून तरुण पिढीला प्रेरणा मिळावी आणि यशवंतराव होळकर यांनी केलेल्या कार्याची ओळख व्हावी, यासाठी ही यात्रा काढण्यात आल्याचं स्वप्निल राजे होळकर यांनी सांगितलं. दरम्यान, या शौर्य यात्रेच्या मार्गावर धनगर समाजाचे पारंपारिक गजनृत्य, घोडे, उंट, ध्वजधारी पादचारी असा दिमाखदार सोहळ्याचेही नियोजन करण्यात आले होते. (Ahmednagar Name Change News)

Ahmednagar Name Change
Chhagan Bhujbal news : शिंदे गटाच्या आमदारांवर लक्ष का नाही ठेवले?.

दरम्यन गेल्यावर्षी जूनमध्ये भाजपचे (BJP) नेते गोपीचंद पडळकर यांनी माजी उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिलं होतं. या पत्रातून त्यांनी अहमदनगरला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचं नाव देण्यात यावं, अशी मागणी केली होती. अहमदनगरमधल्या चौंडी गावात अहिल्याबाईंचा जन्म झाला. त्यामुळे हे नामांतर करावं असंही त्यांनी पत्रात नमूद केलं होतं.

तर, अहमदनगर जिल्ह्याचे अहिल्यादेवी होळकर असे नामांतर करावे, अशी मागणी भाजप (BJP) आमदार राम शिंदे (Ram Shinde) यांनी केली होती. मी पालकमंत्री असल्यापासून माझी हीच मागणी होती. पण दुसरीकडे भाजपचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखेपाटील आणि आमदार सुजय विखेपाटील यांनी या नामांतराला आणि विभाजनाला विरोध केला आहे.यामुळे अहमदनगरच्या नामांतरावरुन भाजपमध्येच दोन दट पडल्याचे पाहायला मिळाले होते.

Edited By- Anuradha Dhawade

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com