Ahmednagar BJP : नगरच्या नामांतर आणि जिल्हा विभाजनावरून विखे पिता पुत्र भाजपमध्ये एकाकी...

Ahmednagar BJP : जिल्हा विभाजन आणि नामांतरावरून नगर भाजपमध्ये दोन गट
Sujay Vikhe Patil And Radhakrishna Vikhe Patil
Sujay Vikhe Patil And Radhakrishna Vikhe Patil Sarkarnama

Ahmednagar BJP : अहमदनगर जिल्ह्याच्या नामांतराबरोबरच आता जिल्हा विभाजनाचा मुद्दाही पेटला आहे. भाजपचे आमदार गोपीचंद पडळकरांनी (Gopichand Padalkar) जिल्ह्याच्या नामांतराचा प्रश्न थेट विधीमंडळात उपस्थित केला. त्यानंतर जिल्हा विभाजन आणि नामांतराचा मुद्दा चर्चेत आला. मात्र याच मुद्द्यावरून महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि खासदार डॉ. सुजय विखे पाटील हे भाजपमध्ये एकाकी पडल्याचे पाहायला मिळत आहे.

अहमदनगर जिल्ह्याचे विभाजन व नामांतर करण्याच्या विरोधात महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) आणि त्यांचे चिरंजीव खासदार डॉ. सुजय विखे (Sujay Vikhe Patil) यांनी भूमिका घेतली आहे. तर भाजपचेच नेते राम शिंदे (Ram Shinde) यांनी विखे पितापुत्रांच्याविरोधात आपली भूमिका जाहीर करत जिल्ह्याच्या नामांतराला आणि विभाजनाला पाठिंबा दर्शवला आहे. त्यामुळे भाजपमध्ये असणारे हे मतभेद आता उघड झाले आहेत.

Sujay Vikhe Patil And Radhakrishna Vikhe Patil
Mahrashtra Politics : औरंगाबाद, उस्मानाबाद'नंतर आता 'या' जिल्ह्याच्या नामांतराची मागणी

एवढंच नाही तर राधाकृष्ण विखे पाटलांनी गोपीचंद पडळकरांना याच मुद्द्यावरून सुनावलंही. ''बाहेरच्या लोकांनी येऊन नामांतराविषयी भाष्य करण्यापेक्षा जिल्ह्यातील लोकांच्या काय भावना आहेत या महत्त्वाच्या आहेत. तसेच याविषयी आपण स्वतः गोपीचंद पडळकरांशी बोलणार आहे '', असं ते म्हणालेत. तर खासदार विखे यांनी पडळकरांच्या भूमिकेशी असहमती दर्शवली आहे. ''कारण नसताना हा विषय उपस्थित करून समाजात विष कालविण्याचा प्रयत्न केला जात आहे'', असा आरोपही विखेंनी पडळकरांवर केला.

याच मुद्द्यावरून नगर शहराचे आमदार संग्राम जगताप आणि खासदार सुजय विखे यांच्यामध्येही मतभेद पाहायला मिळाले. नामांतरापेक्षा जिल्हा विभाजनाची गरज असल्याचं जगतापांनी म्हटलंय. तर आता राम शिंदे यांनीही नामांतराबाबत आपली भूमिका मांडत ''पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर हे नाव द्यावे'', असं म्हटलं आहे.

दरम्यान, अहमदनगर भाजपमध्येच दोन गट पडले असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे. मात्र, याबाबत पक्षातील एकाही वरीष्ठ नेत्यांनी काही भाष्य केलेलं नाही. त्यामुळे येणाऱ्या काळात जिल्हा विभाजन आणि नामांतराच्या प्रश्नाचे काय होणार? तसेच नगर भाजपमधील मतभेदाबाबत पक्ष काय निर्णय घेणार? हे पाहणं महत्वाचं असणार आहे.

Sujay Vikhe Patil And Radhakrishna Vikhe Patil
Teachers constituency : केंद्र, राज्यातील मंत्री, खासदार, आमदारांच्या उपस्थितीत भाजपचे पाटील १२ रोजी अर्ज दाखल करणार ..

जिल्हा विभाजन आणि नामांतरावरून कोण काय म्हटलं?

बाहेरच्या लोकांनी येऊन...; विखेंनी पडळकरांना सुनावलं

''बाहेरच्या लोकांनी येऊन नामांतराविषयी भाष्य करण्यापेक्षा जिल्ह्यातील लोकांच्या काय भावना आहेत या महत्त्वाच्या आहेत. नामांतराच्या किंवा जिल्हा विभाजनाच्या मुद्द्यापेक्षा विनाकारण त्यातून मतभेद तयार होतात. या प्रश्नाला नॉन इशू असताना इशू करण्याचा प्रयत्न सुरू असून या अशा विषयांना माझं अजिबात समर्थन नाही. पडळकरांशी मी या विषयावर स्वतः बोणार आहे'', असं राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले.

हा समाजात विष कालवण्याचा प्रयत्न : खासदार विखे

''अहमदनगरच्या नामांतराच्या मुद्द्यावरून राजकारण करु नका. जोपर्यंत जनता ही मागणी करत नाही तोपर्यंत जिल्ह्याच्याबाहेरील व्यक्तीने अशी मागणी करणे संयुक्तिक नाही. कारण नसताना काही लोक नामांतराचा मुद्दा उपस्थित करुन यामध्ये विष कालविण्याचा प्रयत्न करीत आहेत'', असं म्हणत गोपीचंद पडळकरांना खासदार सुजय विखे पाटलांनी सुनावलं.

Sujay Vikhe Patil And Radhakrishna Vikhe Patil
Sanjay Raut News : शिंदे सरकारबद्दल संजय राऊतांचं विधान खरं होणार? सरन्यायाधीशांची महत्त्वाची टिप्पणी

नामांतराबाबत राम शिंदे काय म्हणाले?

पालकमंत्री असतानाही ही माझी भूमिका होती. विभाजनाची प्रक्रिया अंतिम टप्प्यात होती. मात्र, इतर जिल्ह्याच्या विभाजनाचा विषय आल्याने अहमदनगरच्या विभाजनाचा प्रश्न मागे पडला. आता या प्रश्नासाठी पाठपुरावा सुरू आहे. जेव्हा जिल्हा विभाजनाचा निर्णय होईल त्यावेळी अहमदनगरला प्राधान्य राहील. मात्र विभाजनाबरोबर नामांतराचा प्रश्नही सोडवत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर हे नाव द्यावे, असं राम शिंदे म्हणाले.

आमदार, खासदारांची मतं परस्पर विरोधी

''राष्ट्रवादीचे शहराचे आमदार जिल्हा विभाजनाची मागणी करीत आहेत. मात्र आधी त्यांचं सरकार होतं. त्यावेळी पालकमंत्री आणि महसूलमंत्री हे जिल्ह्यातीलच होते. तेव्हा त्यांनी हा प्रश्न का मार्गी लावला नाही. जिल्हा विभाजन करण्यास माझा वैयक्तिक विरोधच आहे'', असे खासदार विखे पाटील म्हणाले. तर याच मुद्द्यावर राष्ट्रवादीचे शहराचे आमदार यांनी मत मांडताना सांगितलं की, ''नामांतराला आपला विरोध नाही. तो निर्णय स्थानिक पातळीवर व्हावा, मात्र त्यासोबतच जिल्ह्याचे विभाजन व्हावे'', असे मत संग्राम जगतापांनी मांडले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com