Manipur Violence: शिंदे फडणवीसांच्या प्रयत्नांना मोठं यश; मणिपूरमध्ये अडकलेले २५ विद्यार्थी सुखरूप परतले

Eknath Shinde & Devendra Fadnavis : मणिपूरमध्ये महाराष्ट्रातील काही विद्यार्थी अडकले होते....
Manipur Violence
Manipur ViolenceSarkarnama

Mumbai : मागील काही दिवसांपासून मणिपूरमध्ये आरक्षणावरुन आदिवासी समाजातील संघर्ष उफाळून आला आहे. या हिंसाचारात आत्तापर्यंत ६० च्यावर जणांचा मृत्यू झाला असून जवळपास १७०० घरं पेटवण्यात आली आहे. याचवेळी मणिपूरमध्ये महाराष्ट्रातील काही विद्यार्थी अडकले होते. त्यांना परत आणण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी युध्दपातळीवर प्रयत्न केले होते. त्या प्रयत्नांना यश मिळालं असून मणिपूरमधील दंगलीत अडकलेले महाराष्ट्रातील २५ विद्यार्थी सोमवारी सायंकाळी साडेसात वाजता विशेष विमानाने मुंबईत परतले.

सुदानमध्ये (Sudan) सुरु असलेल्या हिंसाचारात अडकलेल्या भारतीय नागरिकांना सुखरुप परत आणण्यासाठी 'ऑपरेशन कावेरी' (Operation Kaveri) हाती घेण्यात आली होती. हे ऑपरेशन यशस्वीरित्या पूर्ण करुन भारतीय वायुसेनेचे शेवटचे विमान 47 प्रवशांना शुक्रवारी 5 मे रोजी मायभूमीत परतले आहे. 'ऑपरेशन कावेरी' अंतर्गत सुदानमधून 3,862 नागरिकांना सुखरुप मायदेशात आणण्यात आले होते. याचवेळी आरक्षणाचा मुद्द्यावरुन सुरु असलेल्या हिंसाचारात मणिपूर(Manipur) धगधगत आहे.

Manipur Violence
Vishwanath Mahadeshwar Death News : ठाकरे गटावर शोककळा;मुंबईचे माजी महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांचं निधन

केंद्र सरकारच्या हस्तक्षेपानंतरही मणिपूरमध्ये हिंसाचार अद्याप सुरुच आहे. या हिंसाचारात महाराष्ट्रातील काही विद्यार्थी मणिपूरच्या हॉस्टेलमध्ये अडकलेले होते. याची माहिती समोर येताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(Eknath Shinde) व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार हालचाली करत तातडीने मणिपूरचे मुख्यमंत्री एन. बिरेन सिंह आणि आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा सरमा यांच्याशी संपर्क साधत मदतीची विनंती केली होती.

यावेळी मुख्यमंत्र्यांनी तुषार आव्हाड आणि विकास शर्मा या विद्यार्थ्यांशी दूरध्वनीवरून संपर्कही साधला होता. त्यांना दिलासा देऊन सर्वतोपरी मदतीची ग्वाही दिली होती. मुख्य सचिव मनोज सौनिक यांना मणिपूरच्या मुख्य सचिव आणि पोलीस महासंचालकांशी संपर्क साधून विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची काळजी घेण्याची विनंती करण्याचे निर्देश शिंदे यांनी दिले होते. या विद्यार्थ्यांना मणिपूर-इम्फाळहून आसाममध्ये गुवाहाटी येथे विशेष विमानाने सोमवारी सकाळी आणण्यात आले. त्यानंतर रात्री विशेष विमानाने हे सर्व विद्यार्थी मुंबईत आगमन दाखल झाले.

Manipur Violence
Manipur Violence: मणिपूरमध्ये हिंसाचार: इंटरनेट, रेल्वे सेवा, बस बंद; कलम ३५५ लागू, नक्की झालंय काय?

थरारक अनुभव...

दिसताक्षणी गोळय़ा घालण्याचा आदेश दिल्यानंतर भीतीचे वातावरण निर्माण झाले. वसतीगृहातून आम्हाला जेवण दिले जात होते, पण अन्नाचा तुटवडा निर्माण झाल्यामुळे जेवण कधीपर्यंत मिळेल, याबाबत शंका होती. पिण्याचे पाणीही मिळत नव्हते असा थरारक अनुभव विद्यार्थ्यांनी सांगितला. तसेच सुखरुप महाराष्ट्रा(Maharashtra)त आणल्यामुळे सरकारचे आभार देखील मानले.

(Edited By Deepak Kulkarni)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com