350th Shivrajyabhishek Sohala: शिवराज्याभिषेक सोहळ्यात मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा: उदयनराजे भोसलेंना दिली महत्त्वाची जबाबदारी

Kokan News: स्वराज्याची राजधानी किल्ले रायगडावर आज (२ जून) छत्रपती शिवाजी महाराज्यांचा राज्याभिषेक सोहळा पार पडला.
350th Shivrajyabhishek Sohala:
350th Shivrajyabhishek Sohala: Sarkarnama

Shivaji Maharaj Rajyabhishek 2023 : स्वराज्याची राजधानी किल्ले रायगडावर आज छत्रपती शिवाजी महाराज्यांच्या राज्याभिषेक सोहळा (Shivrajyabhishek Sohla 2023) पार पडला. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतापगड प्राधिकरण म्हणून घोषणा केली. खासदार उदयनराजे भोसले यांच्याकडे प्रतापगड प्राधिकरणाचे अध्यक्षपदाच जबाबदारी असतील, असेही त्यांनी यावेळी सांगितलं.

उदयनराजे भोसले यांनी प्रतापगड प्राधिकरणाची मागणी केली होती. आजच्या शिवराज्याभिषेक सोहळ्यात मुख्यमंत्र्यांनी प्रतापगड प्राधिकरणाची घोषणा केली. तसेच, "आज लंडनच्या संग्राहलयात महाराजांची भवानी तलवार आणि वाघनखं आहेत. तीही भारतात परत आणण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. तीही महाराष्ट्रात लवकरच परत येईल, असंही त्यांनी सांगितलं. (Maharashtra Politics)

350th Shivrajyabhishek Sohala:
Shivrajyabhishek Sohala 2023: रायगडाच्या पायथ्याशी शिवसृष्टी उभारणार; मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा

शिवराज्याभिषेकानिमित्ताने शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले यांनी, रायगडाच्या पायथ्याला शिवसृष्टी उभारण्याची मागणी केली होती. त्या मागणीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समर्थन दिले. तर गोगावले यांची ही मागणी मान्य करत मुख्यमंत्र्यांनी शिवसृष्टीची घोषणा केली. ''आजच्याच दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला, आज या ऐतिहासिक सोहळ्याला ३५० वर्षे झाली. मी स्वत:ला भाग्यवान समजतो, की या सोहळ्याला मला उपस्थित राहता आलं. त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून सर्वसामान्य लोकांचं काम कऱण्याची संधी आपल्याला मिळाली, अशा भावना  एकनाथ शिंदे (Eknath Shinde) व्यक्त केल्या.

तर आजच्या ३५०व्या शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्ताने राज्यातील सहा महसुली क्षेत्रात ५० कोटी रुपयांचा निधी देऊन शिवरायांच्या जीवनावर आधारित उद्याने उभारणार, असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. यासोबतच राजधानी दिल्लीत शिवरायांचं राष्ट्रीय स्मारक बांधण्यासाठी आम्ही पंतप्रधानांकडे मागणी करणार असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं.

Edited By- Anuradha Dhawade

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com