Shivrajyabhishek Sohala : रायगडावर शिवप्रेमींची अलोट गर्दी, जयघोषांनी आसमंत दुमदुमला; शिंदे,फडणवीस आणि ठाकरे उपस्थित

Crowd of Shiva Lovers at Raigad : हेलिकॉप्टरद्वारे पृष्पवृष्टी, पोलिसांकडून मानवंदना....
Shivrajyabhishek Sohala
Shivrajyabhishek SohalaSarkarnama

350th Shivrajyabhishek Sohala : छत्रपती शिवाजी महाराजांचा ३५० वा राज्याभिषेक दिन तिथीनुसार आज( दि.२) रायगडावर धुमधडाक्यात साजरा होत आहे. या सोहळ्यावेळी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मनसे अध्यक्ष राज ठाकरे, खासदार उदयनराजे भोसले, सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते छत्रपती शिवरायांच्या मूर्तीची विधिवत पूजन व आरती करण्यात आली. या सोहळ्याला किल्ले रायगडावर शिवप्रेमींचा सागर लोटला आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३५० व्या राज्याभिषेक सोहळ्याला सकाळपासून सुरुवात झाली. यावेळी सुरुवातीला छत्रपतींच्या मूर्तीची मंत्रोच्चारात पूजन करण्यात आले. यावेळी राज्यभरातून आलेल्या शिवप्रेमींकडून छत्रपती शिवाजी महाराज की जयच्या जयजयकारांनी रायगड आसमंत दुमदुमून गेला. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(Eknath Shinde), उपमुख्यमंत्र्यांसह उच्च शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, खासदार श्रीरंग बारणे, खासदार सुनील तटकरे यांच्यासह अनेक कार्यकर्ते भल्या पहाटे गडावर दाखल झाले होते.

Shivrajyabhishek Sohala
Eknath Shinde on Ashadhi Wari : मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा; आषाढी वारीत सहभागी वाहनांना टोलमाफी, सुसज्ज यंत्रणा आणि बरचं काही..

रायगडावर शिवराज्याभिषेक दिना(Shivaji Maharaj Rajyabhishek) च्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या सोहळ्यासाठी अवघ्या रायगडावर फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली आहे. तसेच छत्रपती शिवरायांच्या पूर्णाकृती पुतळ्याला यावेळी फुलांनी सजवण्यात आले. महाराजांचा बसलेल्या स्थितीतील चांदीचा पुतळा पालखीसाठी सजवण्यात आला. यावेळी रायगडावर प्रशासनाच्या वतीने हेलिकॉप्टरद्वारे पृष्पवृष्टी करण्यात आली.

या सोहळ्यात कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी पोलिसांचा मोठा बंदोबस्त किल्ले रायगडावर तैनात आहे. किल्ल्याच्या पायथ्याशी पोहचल्यानंतर वाहनांसाठी प्रशस्त पार्किंग व्यवस्था करण्यात आलेली आहे. या पार्किंगमध्ये वाहने उभी केल्यानंतर एसटी महामंडळाच्या बसने गडाच्या पायऱ्यापर्यंत जाण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे.

Shivrajyabhishek Sohala
BJP Political News : २०२४ च्या विधानसभा निवडणुकीतील विजयासाठी भाजप वापरणार ८०च्या दशकातील 'हा' फॉर्म्युला

पोलिसांकडून मानवंदना

पोलिसांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजां(Chhatrapati Shivaji Maharaj) ना मानवंदना देण्यात आली. पोलिस वाद्यांचे वादन झाले. हा सोहळा डोळ्याचे पारणे फेडणारा राहिला. त्याचबरोबर विविध ढोलपथकांनी देखील या ठिकाणी वादन केले. ढोलताशकांच्या वादनाने संपूर्ण किल्ले रायगड दुमदुमून गेला.

(Edited By Deepak Kulkarni)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com