Vaidyanath Sugar Factory Election: मुंडे बहिण-भाऊ यांच्यात सेटलमेंट ;वैद्यनाथ कारखाना निवडणूक बिनविरोध

Settlement Between Pankaja Munde & Dhananjay Munde: दोघे बहिण-भाऊ एकत्र
Pankaja Munde, Dhananjay Munde
Pankaja Munde, Dhananjay Munde Sarkarnama

Vaidyanath Sahakari Sakhar Karkhana Election : भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांनी स्थापन केलेल्या परळी तालुक्यातील पांगरी येथील वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याच्या संचालक पदाची निवडणूक बिनविरोध झाली.

या निवडणुकीसाठी वैद्यनाथ कारखान्याच्या माजी चेअरमन भाजपा राष्ट्रीय सचिव पंकजा गोपीनाथराव मुंडे आणि राष्ट्रवादीचे माजी मंत्री धनंजय मुंडे हे दोघे बहिण-भाऊ एकत्र आले.

Pankaja Munde, Dhananjay Munde
Prakash Ambedkar News: "पवारांचा कित्ता भुजबळांनी गिरवावा; आंबेडकरांनी करुन दिली ही आठवण..

राजकारण न आणता कारखान्याचं हित डोळ्यासमोर ठेवून आम्ही व धनंजय मुंडे यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे चांगला व सकारात्मक पायंडा यातून पडेल असा विश्वास पंकजा मुंडे यांनी व्यक्त केला. यामुळे २१ सदस्यांचे संचालक मंडळ बिनविरोध निवडून आले.

संचालक पदाच्या 21 जागेसाठी एकूण 50 जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. उमेदवारी अर्ज छाननी प्रक्रियेत 50 पैकी 13 अर्ज नामंजूर झाले होते तर 37 अर्ज मंजूर झाले.

Pankaja Munde, Dhananjay Munde
BJP News : शिंदे गटातील खासदारांच्या मतदारसंघावर भाजपचा डोळा ; संयोजक नियुक्तीचे कारण काय ?

काल (गुरुवारी) उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी खासदार प्रीतम मुंडे यांच्यासह 16 जणांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले. त्यामुळे 21 जणांचे अर्ज शिल्लक राहीले. यामुळे 21 उमेदवारांची बिनविरोध निवड झाली.

पंकजा मुंडे म्हणाल्या, "गोपीनाथराव मुंडे साहेबांनी मोठया कष्टातून आणि मेहनतीनं वैद्यनाथ साखर कारखाना उभा केला, पण गेल्या काही वर्षांपासून दुष्काळी परिस्थिती व अन्य कारणांमुळे कारखाना आर्थिक अडचणीतून जात आहे. आताच्या या परिस्थितीत कारखान्याला अडचणीतून बाहेर काढून त्याचं हित पाहणं महत्वाचं होतं म्हणून आम्ही बिनविरोध निवडीचा निर्णय घेतला,"

Pankaja Munde, Dhananjay Munde
Bharatshet Gogawale Birthday: ओ भरतशेठ, तुम्ही नादच करताय थेट, तुमचा ‘बर्थ डे' लईच बेस्ट ; पण जी- 20 ची तयारी होतेय वेस्ट !

हे आहेत बिनविरोध निवडून आलेले 21 उमेदवार

यशश्री मुंडे, पंकजा मुंडे, केशवराव माळी, वाल्मीक कराड, श्रीहरी मुंडे, रेशीम कावळे, ज्ञानोबा मुंडे, राजेश गीते, सतीश मुंडे, अजय मुंडे, पांडुरंग फड, हरिभाऊ गुट्टे, सचिन दरक, सुरेश माने, वसंत राठोड ,चंद्रकेतू कराड ,शिवाजीराव गुट्टे ,शिवाजी मोरे ,सुधाकर सिनगारे ,सत्यभामा उत्तमराव आघाव, मंचक घोबाळे

(Edited By : Mangesh Mahale)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com