BJP News : शिंदे गटातील खासदारांच्या मतदारसंघावर भाजपचा डोळा ; संयोजक नियुक्तीचे कारण काय ?

Maharashtra Politics : कुठल्या जागा लढायच्या याबाबत पक्षश्रेष्ठी चाचपणी करीत आहेत.
bjp vs Balasahebanchi Shivsena
bjp vs Balasahebanchi ShivsenaSarkarnama

bjp vs Shivsena : राज्यात विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांचे वारे वाहण्यास सुरवात झाली आहे. सर्वच राजकीय पक्ष कामाला लागले आहेत. लोकसभा आणि विधानसभा दोन्ही निवडणुका एकाच वेळी होण्याचे शक्यता काही नेत्यांनी व्यक्त केली आहे. आगामी विधानसभेसाठी राज्य पातळीवरील पक्षांनी निवडणुकीच्या जोरदार तयारी केल्याचे दिसते.

आगामी निवडणूक महाविकास आघाडीतील दोन्ही काँग्रेस आणि शिवसेना एकत्र लढणार आहेत. तर दुसरीकडे शिवसेना-भाजपची महायुती रिंगणात असेल. जागा वाटपाबाबत सर्वच पक्षांच्या बैठकांचे सत्र सुरु आहे. कुठल्या जागा लढायच्या याबाबत पक्षश्रेष्ठी चाचपणी करीत आहेत.

bjp vs Balasahebanchi Shivsena
NCP : परवानगी घेऊनच ते शिंदे गटात गेले ; जयंतरावांनी सांगितला एका कार्यकर्त्याचा तो किस्सा..

शिवसेना (शिंदे गट) आणि भाजपमध्ये जागावाटपावरुन निर्णय झालेला नाही. काही जागावरुन शिवसेना भाजपमध्ये वाद होण्याची शक्यता नाकारता येत नाही. जागावाटपाचे सुत्र ठरण्यापूर्वीच शिंदे गटाचा दावा असलेल्या खासदारांच्या लोकसभा मतदारसंघात भाजपने संयोजक नेमले आहेत.

शिंदे गटाच्या 13 खासदारांच्या मतदारसंघातच भाजपने संयोजक नेमलं आहे, त्यामागील कारण काय? असा प्रश्न शिंदे गटातील पदाधिकारी, कार्यकर्त्यांना पडला आहे.यामुळे शिंदे गटात धाकधुक निर्माण झाली आहे.

bjp vs Balasahebanchi Shivsena
Pankaja Munde : पंकजा मुंडेंना भाजपात कोणी विचारत नाही ; त्यांनी आता निर्णय घ्यावा ; राऊतांचे सूचक..

भाजपला जर मतदारसंघाचा आढावा घ्यायचा होता तर त्यांनी संपूर्ण 48 लोकसभा मतदारसंघात घ्यायचा होता किंवा शिवसेनेला ज्या 23 जागा सोडण्यात आल्या त्या मतदारसंघात संयोजक नेमून आढावा घ्यायचा होता, असे राजकीय विश्लेषकांचे मत आहे. शिवसेना खासदारांच्या मतदार संघात संयोजक नियुक्त करणे म्हणजे भाजपाचे दबावतंत्र असल्याची शिंदे गटात चर्चा आहे.

bjp vs Balasahebanchi Shivsena
Vinayak Mete : मोठी बातमी : मराठा आरक्षणासाठी लढणाऱ्या नेत्याच्या नावाने नवीन पक्ष ..

गेल्या लोकसभा निवडणुकीच्यावेळी शिवसेनेला 22 जागा सोडण्यात आल्या होत्या. त्यापैकी 18 जागांवर शिवसेनेने विजय मिळवला. त्यातील 13 खासदार शिवसेनेतून फुटले. त्यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे.

(Edited By : Mangesh Mahale)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com