Raut VS Rane : ''राऊत आतापर्यंत चारवेळा खासदार, तेही एकाच पक्षातून; तुम्ही...!''; ठाकरे गटाच्या नेत्यानं राणेंना फटकारलं

Maharashtra Politics : ...म्हणून राणे भाजपमध्ये!
Nitesh Rane, Sanjay Raut
Nitesh Rane, Sanjay Raut Sarkarnama

Sindhudurg News : ठाकरे गटाचे नेते व खासदार संजय राऊत नित्यनियमानं पत्रकार परिषद घेत केंद्र व राज्य सरकारवर टीकेची झोड उठवत असतात. अखेर भाजपनं राऊतांच्या टीकेला प्रत्युत्तर देण्यासाठी राणेस्त्र बाहेर काढले.आता या दोन नेत्यांकडून एकमेकांच्या वरिष्ठ नेत्यांवर टीकेचे बाण सोडले जात आहेत. याचदरम्यान,भाजप आमदार नितेश राणे हे पुन्हा संसदेची पायरी चढणार नाही असं विधान केलं होतं.त्यावर आता ठाकरे गटाच्या नेत्यानं प्रत्युत्तर देताना राणे कुटुंबाच्या मर्मावर बोट ठेवलं आहे.

ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक(Vaibhav Naik) यांनी माध्यमांशी संवाद साधताना आमदार नितेश राणेंच्या टीकेवर पलटवार केला आहे. नाईक म्हणाले, संजय राऊत आतापर्यंत चारवेळा खासदार झाले. तेही एकाच पक्षातून खासदार झाले. मात्र, राणे कुटुंबीय वेगवेगळ्या पक्षाचे लोकप्रतिनिधी झाले असा खोचक टोला लगावला आहे.

Nitesh Rane, Sanjay Raut
Jayant Patil ED Inquiry : अखेर तब्बल नऊ तासांनंतर राष्ट्रवादीच्या जयंत पाटलांची ईडी चौकशी संपली!

...म्हणून राणे भाजपमध्ये!

भाजपला आपल्याविरोधात बोलणाऱ्यांना जेलमध्ये टाकण्याची खुमखुमी आहे. ईडीला सगळेच सामोरे गेले. मात्र, ईडीच्या भीतीने राणे भाजपमध्ये गेले. त्यामुळे नितेश राणेंना कर नाही त्याला डर कसला हे बोलण्याचा अधिकार नाही अशी टीका वैभव नाईक यांनी केली.

लवकरच बाळासाहेबांचं भव्यदिव्य स्मारक...

उद्धव ठाकरे(Uddhav Thackeray) मुख्यमंत्री झाले आणि मातोश्री दोन बांधलं. मात्र, बाळासाहेबांचं स्मारक बांधू शकले नाहीत अशा शब्दांत नितेश राणेंनी ठाकरेंवर निशाणा साधला होता. यावर वैभव नाईक यांनी बाळासाहेबांच्या स्मारक संदर्भात सर्व बाबी पूर्ण झाल्या आहेत. लवकरच बाळासाहेबांचं भव्यदिव्य स्मारक बांधण्यात येणार आहे असं विधान केलं आहे.

Nitesh Rane, Sanjay Raut
Pune News : अग्निशामक दलाच्या नवीन इमारतीच्या निविदेसाठी राजकीय दबाव; मर्जीतील ठेकेदारासाठी खटाटोप

...यामुळे भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करणार

अधिकृत जागा वाटपावरून आघाडीत अजूनही चर्चा नसताना नितेश राणे त्यावर बोलतात. मात्र, 2019 ला नितेश राणें(Nitesh Rane)चा स्वाभिमान पक्षाला कोणी विचारलं नाही. 2019 च्या विधानसभेच्या निवडणुकीत भाजपने शिवसेनेला डॅमेज करण्यासाठी बंडखोर उमेदवार अनेक ठिकाणी उभे केले. त्यामुळे आज महाविकास आघाडीच्या माध्यमातून भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करणार आहे. त्यासाठी आमचे तिन्ही पक्ष मैदानात आहेत असं वैभव नाईक म्हणालेत.

निष्कलंक जयंत पाटलांवर...

निष्कलंक असलेल्या जयंत पाटील(Jayant Patil) यांच्यावर अशाप्रकारे ईडीच्या नोटिसा पाठवून त्रास दिला जात आहे. मात्र, त्यांच्यासोबत असलेल्या जनता रस्त्यावर उतरून आपल्या भावना व्यक्त करत आहेत. त्या भावना नितेश राणेंना समजणार नाहीत अशी प्रतिक्रिया जयंत पाटील यांच्या ईडीच्या चौकशीसंदर्भात वैभव नाईक यांनी दिली आहे.

(Edited By Deepak Kulkarni)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com