Karad APMC : कराड बाजार समितीवर काँग्रेसची निर्विवाद सत्ता!

Satara krushi utpanna Bajar Samiti : सभापती आणि उपसभापतीपदी काँग्रेसचे उमेदवार...
Satara Apmc
Satara Apmc Sarkarnama

Satara krushi utpanna Bajar Samiti : नुकत्याच राज्यभरात कृषि उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुका पार पडल्या. कराड कृषि उत्पन्न बाजार समितीत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि उदयसिंग उंडाळकर यांच्या गटाच्या पुरस्कृत पॅनेलने दणदणीत विजय मिळवला. त्यानुसार आता पुढील कार्यवाही करण्यात आली. म्हणजेच सभापती आणि उपसभापतीपदी निवडणूक पार पडली. यामध्ये पुन्हा काँग्रेसने बाजी मारत आपली सत्ता राखली आहे.

Satara Apmc
Karad APMC Election: कराड बाजार समितीतील अभद्र युती उधळुन लावा : पृथ्वीराज चव्हाण

आज कराड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती आणि उपसभापतींपदीची निवडप्रक्रिया पार पडली. सभापतीपदी काँग्रेसचे विजयकुमार कदम यांची निवड झाली. तर उपसभापतीपदी संभाजी चव्हाण (वारूंजी) यांची या पदावर बिनविरोध नियुक्ती करण्यात आली. कराड कृषि उत्पन्न बाजार समितीवर काँग्रेसने आपली सत्ता स्थापन केली आहे.

Satara Apmc
Karad Bazar Samiti : कराड बाजार समितीच्या विजयाचा गुलाल घेऊनच पृथ्वीराज चव्हाण कर्नाटकला रवाना

कराड बाजार समितीवर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि उदयसिंह पाटील यांच्या नेतृत्वाखाली रयत पॅनेलने विजय आपली सत्ता राखली आहे. तर या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व कराड उत्तरचे आमदार बाळासाहेब पाटील आणि भाजपचे प्रदेश सदस्य अतुल भोसले यांच्या शेतकरी विकास पॅनलला या दोघांनाही पराभव स्वीकारावा लागला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com