Jayant Patil ED Inquiry : अखेर तब्बल नऊ तासांनंतर राष्ट्रवादीच्या जयंत पाटलांची ईडी चौकशी संपली!

NCP Political News: आयएल अॅण्ड एफएस कोट्यावधी रुपयांचा गैरव्यवहार व संशयास्पद कर्जवाटप केल्याचा ईडीचा आरोप
Jayant Patil
Jayant Patil Sarkarnama

Mumbai : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आज (दि.२२ ) सकाळी ११ वाजता ईडी कार्यालयात चौकशीसाठी उपस्थित राहिले. पाटील यांना ईडीने समन्स पाठवले होते. त्यानुसार इन्फ्रास्ट्रक्चर लीजिंग अँड फायनान्शियल सर्व्हिसेस (आयएल अॅण्ड एफएस) गैरव्यवहार प्रकरणी पाटील यांना नोटीस बजावली होती. तब्बल ९ तासांच्या चौकशीनंतर पाटील हे रात्री साडेनऊच्या सुमारास पाटील ईडी कार्यालयाबाहेर पडले. यावेळी कार्यकर्त्यांनी मोठी घोषणाबाजी केली.

राष्ट्रवादी(Ncp)च्या मुंबई कार्यालयाबाहेर जयंत पाटलांच्या समर्थकांनी त्यांच्या नावाने घोषणाबाजी करायला सुरुवात केली.सांगलीहून काही कार्यकर्ते मुंबईत आले असून काही कार्यकर्ते सांगली येथेच ईडी आणि भाजपाविरोधात राज्यभर राष्ट्रवादी काँग्रेसकडून तीव्र आंदोलन करण्यात आले.

Jayant Patil
Jayant Patil ED Notice : जयंत पाटलांची ईडीकडून चौकशी; पवार म्हणाले, राष्ट्रवादीच्या लोकांकडून सत्ताधाऱ्यांची काही अपेक्षा असेल; पण...

जयंत पाटील(Jayant Patil) यांना शुक्रवारी सकाळी जबाब नोंदवण्यासाठी ईडीने बोलावले होते. पण त्यांनी या समन्सबाबत ईडीला पत्र लिहून वेळ मागून घेतली होती. त्यानुसार ईडीने जयंत पाटील यांना आठवड्याभराची मुदत दिली होती. पाटील यांना ईडीने दुसरे समन्स बजावले असून त्यात २२ मे रोजी चौकशीसाठी उपस्थित राहण्यास सांगितले होते. आयएल अॅण्ड एफएसने दिलेल्या संशयास्पद कर्जप्रकरणी पाटील यांची ईडी चौकशी करण्यात आल्याची माहिती आहे.

हे आहे प्रकरण...

आयएल अॅण्ड एफएस कोट्यावधी रुपयांचा गैरव्यवहार व संशयास्पद कर्जाचे वाटप केल्याचा आरोप आहे. ईडी(ED)ने याप्रकरणी आयएल अॅण्ड एफएसचे दोन माजी लेखापाल व त्यांचे सहाय्यक यांच्याशी संबंधित ठिकाणांवर गेल्या आठवड्यात शोध मोहीम राबवली होती. दिल्ली पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने २०१९ मध्ये दाखल केलेल्या गुन्ह्यांच्या आधारावर याप्रकरणी चौकशीला सुरुवात केली होती. यापूर्वी ऑगस्ट २०१९ मध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचीही ईडीने या प्रकरणी चौकशी केली होती.

Jayant Patil
Jayant Patil ED Enquiry News : ईडीने जयंत पाटलांना कोणत्या प्रकरणात चौकशीसाठी बोलावले; IL&FS कंपनीची इनसाइड स्टोरी...

आयएल अॅण्ड एफएस यांनी विविध कंपन्या व संस्थांना दिलेल्या कर्जांबाबत ईडीला संशय आहे. त्याबाबत आता तपास सुरू आहेत.आयएल अॅण्ड एफएस या कंपनीने २०१८ मध्ये दिवाळखोरीसाठी अर्ज केला होता. तसेच २००५ मध्ये ठाकरे, माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचा मुलगा उन्मेष आणि बांधकाम व्यावसायिक राजन शिरोडकर यांनी कोहिनूर मिल क्र. ३ आणि कोहिनूर सीटीएनएलची स्थापना केली. ठाकरे तीन वर्षांतच या प्रकल्पातून बाहेर पडले होते.
(Edited By Deepak Kulkarni)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com