Uttarakhand News : जबरदस्ती धर्मांतरण करणाऱ्याला आता १० वर्षाची शिक्षा!

Uttarakhand News : उत्तराखंडमध्ये जबरदस्तीने धर्मांतराचा कायदा यूपीच्या धर्तीवर अधिक कडक करण्यात आला आहे.
Pushkarsingh Dhami
Pushkarsingh Dhami Sarkarnama

डेहराडून : उत्तराखंडमध्ये जबरदस्तीने धर्मांतर करणाऱ्यांना आता दहा वर्षांपर्यंत शिक्षा होणार आहे. काल ( बुधवारी ता.16) झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत उत्तराखंड धर्म स्वातंत्र्य (दुरुस्ती) विधेयक 2022 ला मंजुरी देण्यात आली. सचिवालयात मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाची बैठक झाली. यामध्ये उत्तराखंडमध्ये जबरदस्तीने धर्मांतराचा कायदा यूपीच्या धर्तीवर अधिक कडक करण्यात आला आहे.

Pushkarsingh Dhami
Sanjay Raut : ये रिश्ता बहोत पुराना है..; राऊतांकडून बाळासाहेबांना 'तो' फोटो शेअर

उत्तर प्रदेशमध्ये एखाद्या व्यक्तीचे जबरदस्तीने धर्मांतर केल्यास एक ते पाच वर्षांचा तुरुंगवास आणि रु. 25,000 दंड अशी शिक्षा आहे, तर उत्तराखंडमध्ये असे केल्यास दहा वर्षापर्यंतचा तुरुंगवास आणि रु. 25,000 दंड होऊ शकतो. उत्तराखंडमध्ये सामूहिक धर्मांतराच्या प्रकरणात आता तीन ते दहा वर्षांची शिक्षा होणार आहे, यापूर्वी कमाल तीन वर्षांच्या शिक्षेची तरतूद होती.

यासोबतच पीडितांना न्यायालयाच्या माध्यमातून पाच लाख रुपयांची भरपाईही मिळू शकणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, राज्यात धर्मांतराचा कायदा आता दखलपात्र आणि अजामीनपात्र गुन्ह्याच्या श्रेणीत येणार आहे. यापूर्वी हा अदखलपात्र गुन्हा होता. आता सरकार ते विधानसभेच्या पटलावर ठेवणार आहे.

Pushkarsingh Dhami
Bharat Jodo Yatra : 'कदम कदम बढाये जा..' भारत जोडोत केरळच्या बँड पथकाने आणली रंगत!

2018 ला या संदर्भात उत्तराखंडचे मुख्यमंत्री धामी यांनी जबरदस्तीने धर्म परिवर्तन करणाऱ्या विरोधात आणि लव जिहाद करणाऱ्या विरोधात कठोर कायदा करणार असल्याचं सांगितलं होतं. धोक्यातून आणि फसवणूक करून केलेले धर्म परिवर्तन हे अजामीनपात्र गुन्हा असेल. तसंच असं करणाऱ्याला ५ वर्षांची शिक्षा होईल, असा कायदा विधानसभेच्या पटलावर येणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com