मोदी-शहा कर्नाटकातही उत्तराखंड पॅटर्न राबवणार? येडियुरप्पा थेट दिल्लीत दाखल - karnataka cm b s yediyurappa will meet party leadership in delhi | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

मंत्रिमंडळाची बैठक सुरु असताना जयंत पाटलांची प्रकृती बिघडली...ब्रीच कॅण्डी रुग्णालयात दाखल

मोदी-शहा कर्नाटकातही उत्तराखंड पॅटर्न राबवणार? येडियुरप्पा थेट दिल्लीत दाखल

वृत्तसंस्था
शुक्रवार, 16 जुलै 2021

कर्नाटकात भाजपमधील अंतर्गत मतभेद दिवसेंदिवस वाढू लागले आहेत. मुख्यमंत्री बी.एस.येडियुरप्पा यांना पदावरुन हटवावे, अशी मागणी होत आहे. 

बंगळूर : कर्नाटकात (Karnataka) भाजपमधील (BJP) अंतर्गत मतभेद दिवसेंदिवस वाढू लागले आहेत. मुख्यमंत्री बी.एस.येडियुरप्पा (B.S.Yediyurappa) यांना पदावरुन हटवले जावे,  अशी पक्षातूनच मागणी होत आहे. या पार्श्वभूमीवर येडियुरप्पांना दिल्लीला बोलावून घेण्यात आले आहे. त्यामुळे उत्तराखंडप्रमाणे कर्नाटकातही मुख्यमंत्री बदल होईल, अशी शक्यता व्यक्त होत आहे. उत्तराखंडमध्ये पक्षांतर्गत वादामुळे चार महिन्यांत तीन मुख्यमंत्री झाले आहेत. 

येडियुरप्पा यांना पक्ष नेतृत्वाने दिल्लीला पाचारण केले आहे. ते दिल्लीत दाखल झाले असून, ते पहिल्यांदा पक्षाचे अध्यक्ष जे.पी.नड्डा यांची भेट घेतील. त्यानंतर ते केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सायंकाळी 7 वाजता येडियुरप्पा भेट घेणार आहेत. उत्तराखंडचे तत्कालीन मुख्यमंत्री तिरथसिंह रावत यांना असेच अचानक दिल्लीत बोलावण्यात आले होते. नंतर त्यांनी राज्यात परत जाऊन थेट राज्यपालांकडे राजीनामा सोपवला होता. त्यानंतर पुष्करसिंह धामी उत्तराखंडचे नवीन मुख्यमंत्री बनले होते. त्यामुळे कर्नाटकमध्ये उत्तराखंडची पुनरावृत्ती होण्याची शक्यता आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. 

येडियुरप्पा आणि मंत्रिमंडळातील काही सहकाऱ्यांचे संबंध काही दिवसांपासून बिघडले आहेत. राज्य सरकारमध्ये येडियुरप्पा कुटुंबीयांचा सातत्याने हस्तक्षेप सुरू आहे. सरकारच्या प्रत्येक विभागात येडियुरप्पांचा मुलगा ढवळाढवळ करीत आहे, असा आरोप करण्यात येत आहे. कर्नाटकात मागील काही काळापासून भाजपच्या नेत्यांनी उघडपणे मुख्यमंत्र्यांच्या विरोधात भूमिका घेतली आहे. याचबरोबर काही आमदारांनी तर थेटपणे मुख्यमंत्र्यांना आव्हान दिले आहे. राज्यातील भाजप नेत्यांमध्ये मुख्यमंत्र्यांबद्दल मोठी नाराजी आहे. ही नाराजी दूर करण्यासाठी मुख्यमंत्र्यांना पदावरुन हटवले जाईल, अशी चर्चा सुरू आहे. या पार्श्वभूमीवर पक्षाचे प्रभारी अरुणसिंह यांनी नुकतीच राज्यातील नेत्यांशी चर्चा केली होती. 

हेही वाचा : ते केवळ राजकीय नाट्य; पूजा चव्हाणच्या आई-वडिलांच्या जबाबातील गौप्यस्फोट 

काही दिवसांपूर्वी पक्षाचे नेते आमदार एच.विश्वनाथ यांनी येडियुरप्पांबद्दल संपूर्ण मंत्रिमंडळच नाराज असल्याचा बॉम्ब टाकला होता. येडियुरप्पांचे एकेकाळचे निकटवर्ती सहकारी के.एस.ईश्वरप्पा यांनीही विरोधात मोहीम उघडली आहे. ईश्वरप्पा यांनी तर मुख्यमंत्र्यांच्या विरोधात थेट राज्यपालांकडे तक्रार केली होती. आता मुख्यमंत्र्यांनी दिल्लीला बोलावण्यात आल्याने पक्षांतर्गत विरोधकांच्या उत्साह संचारला आहे. राज्यातील नेतृत्वबदलासाठी मुख्यमंत्र्यांना दिल्लीला बोलावले असल्याचे काही जणांचे म्हणणे आहे. आम्ही हाय कमांडच्या निर्णयाची प्रतीक्षा करीत आहोत, असे एका मंत्र्यांने सांगितले. 
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख