BJP : भाजप नेत्यानंच रचलं 'लव जिहाद'चं षडयंत्र; मुलीने न्यायालयातच केली पोलखोल

मुस्लिम तरूणाने आपल्याशी गैरवर्तन केल्याचा आरोप मुलीने आधी केला होता.
Love Jihad News, Uttar Pradesh Latest News
Love Jihad News, Uttar Pradesh Latest NewsSarkarnama

लखनौ : मागील काही वर्षांपासून देशात लव जिहादवरून बरंच राजकारण तापलं आहे. उत्तर प्रदेश (Uttar Pradesh) सरकारनं तर कायदाही केला आहे. पण याच राज्यात एक धक्कादायक बाब समोर आली आहे. मागील आठवड्यातील लव जिहादच्या प्रकरणात भाजप (BJP) नेत्याचाच हात असल्याचे समोर आले आहे. या प्रकरणात तरूणाला अडकवण्यासाठी या नेत्यानंच मुलीला पैसे देऊन षडयंत्र रचल्याचे समोर आले आहे. (Love Jihad News)

उत्तर प्रदेशातील कासगंजमध्ये 15 जुलै रोजी लव जिहादचा प्रकार समोर आला होता. पण या प्रकरणी आरोप करणाऱ्या मुलीने न्यायालयातच आपला जबाब बदलला आहे. मुस्लिम तरूण प्रिंस कुरेशीला खोट्या प्रकरणात अडकवण्यासाठी आपल्याला सांगण्यात आले होते, असं तिनं न्यायालयात सांगितलं आहे.

Love Jihad News, Uttar Pradesh Latest News
Shiv Sena : शिवसेना, धनुष्यबाण शिंदेंकडे जाणार? माजी निवडणूक आयुक्तांनी थेटच सांगितलं...

मुलीच्या आरोपानंतर पोलींनी भाजपचा युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष अमन चौहान आणि त्याच्या दोन साथीदारांना अटक केली. न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला आहे. ही मुलगी दिल्लीत राहणारी आहे. कुरेशीही दिल्लीतीलच आहे. कुरेशी याने नाव बदलून आपल्याशी गैरवतर्णूक केल्याचा आरोपा मुलीने सुरूवातीला केला होता.

कुरेशी याने सुरूवातीला मोनू गुप्ता बनून फेसबुकवरून आपल्याशी मैत्री वाढविली होती. नंतर तो मुस्लिम असल्याचे समल्याचे मुलीने म्हटले आहे. अमन चौहान आणि कुरेशी यांच्यात पैशांवरून वाद झाला होता. त्यानंतर रागातून चौहान याने हे षडयंत्र रचल्याचा दावा पोलिसांकडून केला जात आहे.

Love Jihad News, Uttar Pradesh Latest News
Shiv Sena : पालिका निवडणुकीत धनुष्यबाण दिसणार का? शिंदे अन् ठाकरेंसाठी धोक्याची घंटा

दरम्यान, भाजपचे जिल्हाध्यक्ष के. पी. सिंह यांनी याप्रकरणी पोलिसांना संपूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. चौहान याच्यासह कुरेशी आपल्या पक्षाचा सदस्य आहे. त्यामुळे या प्रकरणाच्या चौकशी सहकार्य केले जाईल, असं सिंह यांनी सांगितले. चौहान याने आपल्यावरी आरोप फेटाळून लावले आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com