सुशांतशी मला लग्न करायचे होते अन् त्याच्यासाठी मी अनेक 'बिग बजेट' चित्रपट सोडले!

अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणाचे गूढ अद्याप नऊ महिन्यांनंतरही सीबीआयला उलगडता आलेले नाही. या प्रकरणात अखेर अंकिता लोखंडेने मौन सोडले आहे.
sushant singh rajput ex girlfriend ankita lokhande opens about their relationship
sushant singh rajput ex girlfriend ankita lokhande opens about their relationship

मुंबई : अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणाचा तपास करणाऱ्या केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) अद्याप तपासाची प्रगती जाहीर केलेली नाही. सुमारे नऊ महिन्यांनतरही सुशांतच्या मृत्यूचे गूढ कायम आहे. दरम्यान, सुशांतची एक्स गर्लफ्रेंड अंकिता लोखंडेने अखेर मौन सोडले आहे. सुशांतशी लग्न करण्यासाठी मी हॅपी न्यू इयर, राम लीला, सुलतान, बाजीराव मस्तानी यासारख्या बड्या चित्रपटांच्या ऑफर सोडून दिल्या, असा गौप्यस्फोट तिने केला आहे. 

अंकिताने सुशांतच्या मृत्यूनंतरची तिची भावनिक स्थिती नऊ महिन्यांनंतर अखेर मांडली आहे. सुशांतच्या मृत्यूनंतर अंकिताला मोठा धक्का बसला होता. सुशांतशी ब्रेकअप करुन अंकिता ही विकी जैनसोबत राहत होती. यावरुन सुशांतचे चाहते सातत्याने तिला ट्रोल करीत आहेत. अंकिता आणि सुशांत हे सहा वर्षे एकमेकांसोबत राहत होते. त्यांचा 2016 मध्ये ब्रेकअप झाला होता. 

अंकिताने म्हटले आहे की, मला सुशांतसोबत लग्ल करायचे होते. यासाठी मी अनेक मोठ्या चित्रपटांवर पाणी सोडले. सुशांतशी ब्रेकअप झाल्यानंतर मी काही न बोलणे पसंत केले. मला आमच्यातील नात्याचा आदर ठेवायचा होता. सुशांतला करियरवर जास्त लक्ष द्यायचे असल्याने त्याने ब्रेक अप केला. यानंतर माझ्या आयुष्यात विकी जैन आला. मी त्याच्यासोबत खूप आनंदी आहे. परंतु, सुशांतच्या मृत्यूनंतर विकीला ट्रोल करण्यात आले. त्याच्याबाबत वाईट बोलण्यात आले. 

सुशांतशी लग्न करण्यासाठी मी हॅपी न्यू इयर, राम लीला, सुलतान, बाजीराव मस्तानी यासारख्या बड्या चित्रपटांच्या ऑफर सोडून दिल्या. मी मकाऊमध्ये शाहरुख खान यांना सुशांतसोबत भेटले होते. त्यावेळी त्यांनी मला चांगली भूमिका देण्याचे आश्वासन दिले होते. परंतु, मला माझ्यापेक्षा सुशांतला चांगली भूमिका मिळावी, असे वाटत होते. यासाठी मी सुशांतला पाठबळ देत होते. परंतु, ब्रेकअप झाल्यानंतर माझ्या लक्षात आले की मीसुद्धा एक व्यक्ती आहे. मलाही माझा विचार करायला हवा, असे अंकिताने म्हटले आहे.  

सुशांत हा 14 जूनला मृतावस्थेत आढळला होता. या प्रकरणी सुरूवातीला मुंबई पोलीस तपास करीत होते. मुंबई पोलिसांनी हा आत्महत्येचा प्रकार असल्याचे स्पष्ट केले होते. मात्र, अभिनेत्री कंगना राणावत, भाजपचे खासदार सुब्रह्मण्यम स्वामी आणि राज्यातील भाजप नेत्यांनी सुशांतची हत्या झाल्याचा दावा केला होता. 

या प्रकरणात नंतर बिहार सरकारनेही उडी घेतली होती. बिहारमध्ये एफआयआर दाखल करुन तेथील पोलीस पथक तपासासाठी मुंबईत दाखल झाले होते. हा तपास सीबीआयकडे सोपवावा यासाठी विरोधी पक्ष भाजपने आणि बिहार सरकारने आक्रमक भूमिका घेतली होती. अखेर सर्वोच्च न्यायालयाने हा तपास सीबीआयकडे सोपवला होता. 

Edited by Sanjay Jadhav

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com