मोठी बातमी : सुशांत मृत्यू प्रकरणात त्याची बहीणच अडचणीत; सीबीआय चौकशीच्या फेऱ्यात

अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणात त्याची बहीण अडचणीत आली आहे. तिच्याविरोधात आता सीबीआय तपास करणार आहे.
cbi will investigate fir against sushant singh rajput sister priyanka singh
cbi will investigate fir against sushant singh rajput sister priyanka singh

मुंबई : अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणाचा तपास करणाऱ्या केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) अद्याप तपासाची प्रगती जाहीर केलेली नाही. सुमारे नऊ महिन्यांनतरही सुशांतच्या मृत्यूचे गूढ कायम आहे. मात्र, आता या प्रकरणात सुशांतची बहीण प्रियांका सिंह  अडचणीत आली आहे. तिच्याविरुद्ध दाखल एफआयआर रद्द करण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला असून, सीबीआय याचा तपास करणार आहे. 

सुशांतला त्याच्या बहिणींनी बोगस प्रिस्क्रिप्शनच्या माध्यमातून बंदी घातलेली औषधे दिल्याप्रकरणी सुशांतची प्रेयसी रिया चक्रवर्तीने वांद्रे पोलिसांकडे मागील वर्षी 7 सप्टेंबरला तक्रार दिली होती. यात तिने सुशांतची बहीण मितू सिंह, प्रियांका सिंह, दिल्लीतील आरएमएल हॉस्पिटलमधील डॉ.तरुण कुमार यांच्यासह इतरांवर अमली पदार्थ प्रतिबंधक कायदा आणि टेलिमेडिसीन प्रॅक्टीस गाईडलाईन्सनुसार गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. 

रियाने दाखल केलेल्या तक्रारीत म्हटले होते की, डॉ.तरुण कुमार याचे बोगस प्रिस्क्रिप्शन प्रियाकांने सुशांतला पाठवले होते. डॉ. कुमार याने बंदी असलेली औषधे त्या प्रिस्क्रिप्शमध्ये दिले होली. सुशांतशी कोणतीही चर्चा न करता ही औषधे त्याला देण्यात आली होती. ही औषधे टेलिमेडिसीन प्रॅक्टिस गाईडलाईन्सनुसार ऑनलाइन देता येत नाहीत. 

रियाच्या तक्रारीच्या आधारे मुंबई पोलिसांनी एफआयआर दाखल करुन तो सीबीआयकडे वर्ग केला होता. याला सुशांतच्या बहिणींनी उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. मागील महिन्यात उच्च न्यायालयाने या प्रकरणात मितूला दिलासा दिला मात्र, प्रियांकाला दिलासा देण्यास नकार दिला होता. याला त्यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. सर्वोच्च न्यायालयाने हा एफआयआर रद्द करण्यास नकार दिला. यामुळे सीबीआय आता या एफआयआरचा तपास करणार आहे.

सुशांत हा 14 जूनला मृतावस्थेत आढळला होता. या प्रकरणी सुरूवातीला मुंबई पोलीस तपास करीत होते. मुंबई पोलिसांनी हा आत्महत्येचा प्रकार असल्याचे स्पष्ट केले होते. मात्र, अभिनेत्री कंगना राणावत, भाजपचे खासदार सुब्रह्मण्यम स्वामी आणि राज्यातील भाजप नेत्यांनी सुशांतची हत्या झाल्याचा दावा केला होता. 

या प्रकरणात नंतर बिहार सरकारनेही उडी घेतली होती. बिहारमध्ये एफआयआर दाखल करुन तेथील पोलीस पथक तपासासाठी मुंबईत दाखल झाले होते. हा तपास सीबीआयकडे सोपवावा यासाठी विरोधी पक्ष भाजपने आणि बिहार सरकारने आक्रमक भूमिका घेतली होती. अखेर सर्वोच्च न्यायालयाने हा तपास सीबीआयकडे सोपवला होता. 

Edited by Sanjay Jadhav

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com