सुशांतच्या मृत्यूनंतर माझ्याही मनात येत होते आत्महत्येचे विचार...

अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणाचे गूढ अद्याप नऊ महिन्यांनंतरही सीबीआयला उलगडता आलेले नाही.
shushant sigh rajput ex girlfriend ankita lokhande talks about trauma
shushant sigh rajput ex girlfriend ankita lokhande talks about trauma

मुंबई : अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणाचा तपास करणाऱ्या केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) अद्याप तपासाची प्रगती जाहीर केलेली नाही. सुमारे नऊ महिन्यांनतरही सुशांतच्या मृत्यूचे गूढ कायम आहे. दरम्यान, सुशांतची एक्स गर्लफ्रेंड अंकिता लोखंडेने तिच्यावर सुशांतच्या मृत्यूंनंतर ओढवलेल्या परिस्थितीबाबत अखेर खुलासा केला आहे. 

अंकिताने सुशांतच्या मृत्यूनंतरची तिची भावनिक स्थिती नऊ महिन्यांनंतर अखेर मांडली आहे. सुशांतच्या मृत्यूनंतर अंकिताला मोठा धक्का बसला होता. सुशांतशी ब्रेकअप करुन अंकिता ही विकी जैनसोबत राहत होती. यावरुन सुशांतचे चाहते सातत्याने तिला ट्रोल करीत होते. यामुळे सुशांतच्या मृत्यूनंतर तिलाही आत्महत्येचे विचार येते होते. 

अंकिताने म्हटले आहे की, लोक यायचे आणि मला म्हणायचे की तू सुशांतला सोडून दिलेस. तुम्हाला काय माहिती?  मला कोणाला दोष द्यायचा नाही. सुशांतनेच हा पर्याय निवडला होता. त्याला करिअर करायचे होते त्यामुळे त्याने ब्रेकअप घेतला. सुशांतच्या आत्महत्येनंतर मी अनेक दिवस झोपतच नव्हते. तसेच, माझ्या आई-वडिलांसह कोणाशी बोलतही नव्हते. त्यावेळी माझ्याही मनात आत्महत्येचे विचार येत होते.    

सुशांत हा 14 जूनला मृतावस्थेत आढळला होता. या प्रकरणी सुरूवातीला मुंबई पोलीस तपास करीत होते. मुंबई पोलिसांनी हा आत्महत्येचा प्रकार असल्याचे स्पष्ट केले होते. मात्र, अभिनेत्री कंगना राणावत, भाजपचे खासदार सुब्रह्मण्यम स्वामी आणि राज्यातील भाजप नेत्यांनी सुशांतची हत्या झाल्याचा दावा केला होता. 

या प्रकरणात नंतर बिहार सरकारनेही उडी घेतली होती. बिहारमध्ये एफआयआर दाखल करुन तेथील पोलीस पथक तपासासाठी मुंबईत दाखल झाले होते. हा तपास सीबीआयकडे सोपवावा यासाठी विरोधी पक्ष भाजपने आणि बिहार सरकारने आक्रमक भूमिका घेतली होती. अखेर सर्वोच्च न्यायालयाने हा तपास सीबीआयकडे सोपवला होता. 

सीबीआयने दोन वेळा सुशांतच्या मृत्यूच्या वेळचा घटनाक्रम त्याच्या फ्लॅटमध्ये तयार करुन पुन्हा तपासला होता. त्यानंतर सीबीआयच्या पथकासमवेत अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेच्या (एम्स) तीन न्यायवैद्यक तज्ञांनी मुंबईतील सुशांतच्या घराची तपासणी केली होती. या  पथकाने सुशांतचा फ्लॅट आणि इमारतीच्या छताची काही काळ तपासणी केली होती. या पथकाने सुशांतच्या मृत्यूची वेळ शवविच्छेदन अहवालात नसल्याबद्दल प्रश्नचिन्हही उपस्थित केले होते. 

सीबीआयकडे 'एम्स'च्या पथकाने अहवाल सादर केला होता. मुंबई पोलिसांनी दिलेला सुशांतचा शवविच्छेदन अहवाल आणि इतर पुराव्यांच्या आधारे तपासणी करुन 'एम्स'च्या पथकाने हा अहवाल तयार केला होता. सीबीआयने या अहवालाचा अभ्यास केला आहे. या प्रकरणातील इतर पुराव्यांच्या आधारे सीबीआय अंतिम निष्कर्षापर्यंत पोचणार आहे. 'एम्स'च्या अहवालात सुशांतवर विषप्रयोग झाला नसल्याची बाबही नमूद करण्यात आली होती. यामुळे सुशांतने आत्महत्या केली असून, त्याची हत्या झाली नसल्याचा निष्कर्ष सीबीआयने काढला आहे, अशी चर्चा सुरू होती. 

मात्र, सीबीआयने या प्रकरणी खुलासा करीत तपास सुरू असल्याचे म्हटले होते. सीबीआयने म्हटले होते की, सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणाचा तपास अजून सुरू आहे. सर्व पैलू काळजीपूर्वक तपासून पाहण्याचे काम सुरू आहे. सीबीआयने याबाबत अद्याप कोणताही अंतिम निष्कर्ष काढलेला नाही. 

Edited by Sanjay Jadhav

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com