Congress-Trinmool Congress: राहुल गांधींसाठी ममता बॅनर्जींची नरमाईची भूमिका; काँग्रेस-तृणमूल काँग्रेस एकत्र येणार?

आगामी लोकसभा निवडणुकीसाठी ममता बॅनर्जींनी बिगर काँग्रेस बिगर-काँग्रेस, गैर-भाजप' तिसरी आघाडी तयार करण्याची तयारी सुरु केली होती
Congress-Trinmool Congress
Congress-Trinmool CongressSarkarnama

Congress-Trinmool Congress News: काही दिवसांपूर्वी 'मोदी आडनावा'वर केलेल्या टिप्पणीप्रकरणी सुरत येथील कनिष्ठ न्यायालयाने काँग्रेस नेते राहुल गांधी यांना दोषी ठरवत दोन वर्षांची शिक्षा दिली.न्यायालयाच्या या निर्णयानंतर लोकसभेतही राहुल गांधींचे (Rahul Gandhi) सदस्यत्व रद्द करण्यात आले. राहुल गांधी पुढील ६ वर्षे निवडणूक लढवण्यावर बंदी घालण्यात आली. हे संपूर्ण प्रकरण न्यायालयात प्रलंबित आहे.

पण अशातच गेल्या काही वर्षापासून काँग्रेसपासून दुरावलेले अनेक पक्षही राहुल गांधींच्या समर्थनार्थ पुढे आले आहेत. विशेष म्हणजे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींचे (Mamata Banarjee) नाव यात घ्यावे लागेल. गेल्या काही वर्षांपासून काँग्रेसपासून अंतर राखणाऱ्या तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जीही राहुल गांधींच्या समर्थनार्थ उतरल्या आहेत.राहुल गांधींचे सदस्यत्व रद्द करण्याच्या निर्णयावर ट्विट करत त्यांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे."पीएम मोदींच्या नव्या भारतात विरोधी पक्षाचे नेते भाजपच्या निशाण्यावर आहेत.'' असे ट्विट त्यांनी केलं आहे.

Congress-Trinmool Congress
Ashok Gehlot & Sachin Pilot Dispute : काँग्रेसची कायम डोकेदुखी ठरणारा गेहलोत-पायलट संघर्ष काय?

'गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या भाजप नेत्यांचा मंत्रिमंडळात समावेश होतो, विरोधी नेत्यांना त्यांच्या भाषणासाठी अपात्र ठरवले जाते. आज आपण आपल्या घटनात्मक लोकशाहीचा नवा निचांक पाहिला आहे.” असं त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. पण राहुल गांधींवर झालेल्या कारवाईनंतर ममता बॅनर्जी यांची भूमिका काँग्रेसबाबत मवाळ झाली आहे का? असा सवाल आता उपस्थित होऊ लागला आहे.

न्यायालयाचा हा निर्णय आणि राहुल गांधी यांचे सदस्यत्व रद्द होण्यापूर्वी तृणमूल काँग्रेसच्या ममता बॅनर्जी लोकसभा निवडणुकीसाठी 'बिगर-काँग्रेस, गैर-भाजप' तिसरी आघाडी तयार करण्याच्या ध्येयावर काम करत होत्या. 2024 मध्ये मे 2023 आणि 2024 मध्ये होणाऱ्या पंचायत निवडणुकीत त्यांचा पक्ष एकटाच उतरेल, अशी घोषणाही त्यांनी बंगालमध्ये केली होती.

Congress-Trinmool Congress
Arvind Sawant News : देवेंद्र फडणवीसांनी ‘त्या’ दुर्घटनेची जबाबदारी झटकली !

दरम्यान, राहुल गांधींच्या अपात्रतेमुळे इतर पक्षांमध्ये काँग्रेसबद्दल सहानुभूती तर निर्माण झालीच, पण विरोधकांमध्येही भीती निर्माण झाली आहे. टीएमसीने काँग्रेसबद्दल नरमाईची भूमिका घेण्यामागे एक कारण हेदेखील असू शकते की या संकटाच्या वेळी राहुल गांधी किंवा काँग्रेसला पाठिंबा न दिल्याने सामान्य लोकांमध्ये टीएमसीची प्रतिमा खराब होईल, असेही एक सांगितले जात आहे.

दुसरीकडे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनीदेखील आपल्या सोशल मीडियावर ट्विट करत भाजपवर निशाणा साधला आहे. "राहुल गांधींचे लोकसभा सदस्यत्व रद्द करणे धक्कादायक आहे.देशासाठी हा अत्यंत कठीण काळ आहे. त्यांनी संपूर्ण देशाला घाबरवले आहे. सत्तेच्या विरोधात एकजूट व्हाव लागेल." असे त्यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहीलं आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com