Mamta Banarjee Birthday अटलजींपासून मोदी-शहांना थेट भिडणारी बंगालची वाघिण

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जीं लढवय्या महिला नेत्या म्हणून ओळखल्या. २०२१ मध्ये पार पडलेल्या विधानसभा निवडणूकांमध्ये आपण त्यांचा हा लढवय्या गुण पाहिला, पण त्यांच्या आयुष्याशी संबंधित काही रंजक आणि आश्चर्यकारक गोष्टीही आहेत.
Mamta Banarjee Birthday अटलजींपासून मोदी-शहांना थेट भिडणारी बंगालची वाघिण

Mamta Banarjee Birthday

Published on

Mamta Banarjee Birthday

Mamta Banarjee Birthday

ममता बॅनर्जी यांचा जन्म 5 जानेवारी 1955 रोजी पश्चिम बंगालची राजधानी कोलकाता येथे एका ब्राह्मण कुटुंबात झाला. ममता यांनी वयाच्या १५ व्या वर्षी उच्च माध्यमिक परीक्षा उत्तीर्ण केली आणि त्याच वर्षी त्यांनी राजकारणातही प्रवेश केला. त्यांचे वडील प्रोमिलेश्वर बॅनर्जी हे स्वातंत्र्यसैनिक होते.

Mamta Banarjee Birthday

Mamta Banarjee Birthday

ममता १७ वर्षांची असताना वैद्यकीय सुविधांअभावी त्यांच्या वडिलांचा मृत्यू झाला. ममता बॅनर्जी केवळ राजकारणीच नसून त्या उत्तम चित्रकार, लेखिका, कवयित्री, देखील आहेत. विशेष म्हणजे त्या निसर्गप्रेमीही आहेत.

Mamta Banarjee Birthday

Mamta Banarjee Birthday

गेल्या वर्षी झालेल्या ममता बॅनर्जी तिसऱ्यांदा मुख्यमंत्री झाल्या. आपल्या वैयक्तित जीवनासह राजकीय जीवनातही त्यांनी अनेक चढउतार पाहिले. त्यांचे जीवन संघर्ष, पराभव आणि राजकीय यशांचा भारलेले आहे. ममता बॅनर्जी नेहमी सार्वजनिक जीवनाकडे अधिक लक्ष दिले आणि स्वतःला एक खंबीर आणि जमीनीवर पाय रोवलेला राजकारणी म्हणून सिद्ध केले. प्रादेशिक नेत्या असूनही त्या नेहमीच राष्ट्रीय राजकारणात सक्रिय होत्या.

Mamta Banarjee Birthday

Mamta Banarjee Birthday

तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी आणि ममता बॅनर्जी एकेकाळी एकाच सत्ताकेंद्रावर कार्यरत होते. काँग्रेसमधून बाहेर पडल्यानंतर त्यांनी तृणमुल कॉंग्रेस पक्षांची स्थापना केली. त्यावेळी ममता बॅनर्जी केंद्र सरकारमध्ये रेल्वे मंत्री होत्या. 13 ऑक्टोबर 1999 रोजी सत्तेवर आलेल्या एनडीए आघाडीमध्ये टीएमसी भाजपचा सहयोगी पक्ष होता.

Mamta Banarjee Birthday

Mamta Banarjee Birthday

पश्चिम बंगालमध्ये असताना त्या कम्युनिस्ट पक्षाच्या विरोधक म्हणून काम करत होत्या. बंगालमधील हिंसाचारासाठी ममता बॅनर्जीं प्रचंड आक्रमक झाल्या होत्या. आपल्या कार्यकत्यांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी पंतप्रधान वाजपेयींना भेटून थेट पिशवीतून कवटी आणि हाडे वाजपेयींच्या टेबलावर ठेवली आणि यांना न्याय मिळवून द्या अशी मागणी केली.

Mamta Banarjee Birthday

Mamta Banarjee Birthday

ममता बॅनर्जी यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल लोकांना फारसे माहिती नाही. कारण त्यांचे वैयक्तिक आयुष्य नगण्य आहे. त्यांनी लग्न केले नाही. त्यांच्या कुटुंबात त्यांचे 6 भाऊ आणि त्यांची मुले यांचा उल्लेख आहे. त्यांचा पुतण्या अभिषेक हा त्यांचा राजकीय उत्तराधिकारी मानला जातो. ममता बॅनर्जी नेहमी निळ्या रंगाच्या बॉर्डर असलेल्या पांढऱ्या साडीतच पाहायला मिळतात तर पायात नेहमी चप्पल घातलेली दिसते.

ममता बॅनर्जी यांचा विधानसभा निवडणूकांमधला 'खेला होबे' चा नारा यंदा चर्चेचा केंद्रबिंदू राहिला. तृणमूल काँग्रेस (TMC) च्या सुप्रीमो ममता बॅनर्जी यांनी राज्य विधानसभा निवडणुकीत घवघवीत विजय मिळवल्यानंतर सलग तिसऱ्यांदा पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. मात्र, नंदीग्राम जागेवर त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. भारतीय जनता पक्षाचे नेते शुभेंदू अधिकारी यांनी नंदीग्राम जागेवर बॅनर्जी यांचा पराभव केला. नंतर, बॅनर्जींनी त्यांचा बालेकिल्ला असलेल्या भवानीपूरमधील पोटनिवडणुकीत विक्रमी फरकाने विजय मिळवला. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा याठिकाणी प्रचारासाठी आले होते. मात्र भाजपला आव्हान देत त्यांनी पश्चिम बंगाल मध्ये तिसऱ्यांदा सत्ता स्थापन केली. अनेकदा राजकीय विश्लेषकही अटलजींपासून मोदी-शहांना टक्कर देणारी बंगालची वाघिण म्हणून संबोधतात.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in