कोरोनाचा कहर पाहून उच्च न्यायालयानेच लावला पाच शहरांत लॉकडाउन

देशात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागला आहे. देशात काल तब्बल 2 लाख 73 हजार नवीन कोरोना रुग्ण सापडले आहेत.
high court orders state government for lockdown in five cities of uttar pradesh
high court orders state government for lockdown in five cities of uttar pradesh

नवी दिल्ली : देशात कोरोनाची दुसरी लाट आली असून, कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागला आहे. देशात काल 2 लाख 73 हजार नवीन कोरोना रुग्ण सापडले आहेत. उत्तर प्रदेशातही कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढू लागली आहे. या पार्श्वभूमीवर उच्च न्यायालयानेच राज्यातील पाच शहरांमध्ये लॉकडाउन लावला आहे. 

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे कोरोना पॉझिटिव्ह सापडले आहेत. कोरोनाच्या संकटामुळे राज्यातील आरोग्य व्यवस्था दिवसेंदिवस ढासळू लागली आहे. रुग्णसंख्या वाढीचा वेग कमी करण्यासाठी राज्यात 15 मेपर्यंत दर रविवारी लॉकडाउन जाहीर केला आहे. राज्यात शनिवारी रात्री 8 वाजल्यापासून सोमवारी सकाळी 7 वाजेपर्यंत लॉकडाउन असणार आहे. 

आता अलाहाबाद उच्च न्यायालयाने राज्यातील कोरोना प्रादुर्भावाची गंभीर दखल घेतली आहे. राज्यातील पाच शहरांमध्ये लॉकडाउन लावण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिले आहेत. प्रयागराज, लखनौ, वाराणसी, कानपूर नगर आणि गोरखपूर या शहरांत 26 एप्रिलपर्यंत संपूर्ण लॉकडाउन लागू होणार आहे. या शहरांमध्ये लॉकडाउनमध्ये फक्त अत्यावश्यक सेवा सुरू राहणार आहेत. 

लॉकडाउनच्या काळात सार्वजनिक ठिकाणी सर्व धार्मिक कार्यक्रमांना बंदी असणार आहे. या पाच शहरांत फळे, भाजीपाला विक्रेत, दूध आणि ब्रेड विक्रेते यांनी दररोज सकाळी 11 वाजेपर्यंत परवानगी असेल. त्यानंतर फक्त अत्यावश्यक सेवा तेवढ्या सुरू राहतील, असे उच्च न्यायालयाने बजावले आहे. 

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेशात काल तब्बल 30 हजार 956 रुग्ण सापडले आहेत. ही राज्यातील आतापर्यंतची उच्चांकी रुग्णसंख्या आहे. तसेच, राज्यात काल 129 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. उत्तर प्रदेशात एकूण कोरोना रुग्णांची संख्या 6 लाख 50 हजार 33 आहे. यातील सक्रिय रुग्णांची संख्या 1 लाख 91 हजार 457 आहे. कोरोनामुळे आतापर्यंत 9 हजार 830 जणांचा मृत्यू झाला आहे. 

देशात काल 2 लाख 73 हजार नवीन कोरोना रुग्ण सापडले आहेत. तसेच, काल देशभरात 1 हजार 619 जणांचा काल कोरोनाने मृत्यू झाला आहे. देशात आतापर्यंत एकूण 1 कोटी 50 लाख 61 हजार 919 जणांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. यातील सक्रिय रुग्णांची संख्या 19 लाख 29 हजार 329 आहे. 

Edited by Sanjay Jadhav 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com