बनावट कोरोना लसीककरणाचे कनेक्शन थेट राज्यपालांपर्यंत - Governor Jagdeep Dhankhars connection with Debanjan deb claims Trinamool congress | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख यांचे निधन...
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोल्हापुरात दाखल..पुरग्रस्त भागाची पाहणी

बनावट कोरोना लसीककरणाचे कनेक्शन थेट राज्यपालांपर्यंत

वृत्तसंस्था
गुरुवार, 1 जुलै 2021

काही दिवसांपूर्वी एका बनावट लसीकरण शिबीराचा पर्दाफाश झाला.

कोलकाता :  विधानसभा निवडणुकीनंतर झालेल्या हिंसाचारानंतर पश्चिम बंगालमध्ये आता बनावट कोरोना लसीकरणावरून जोरदार राजकारण सुरू आहे. भाजपकडून राज्य सरकारला घेरण्याचा प्रयत्न सुरू असतानाच तृणमूल काँग्रेसने थेट राज्यपालांवरच आरोप केल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या बोगस आएएस अधिकाऱ्याचे राज्यपालांशी संबंध असल्याचा आरोप करण्यात आला आहे. (Governor Jagdeep Dhankhars connection with Debanjan deb claims Trinamool congress)

कोलकतामध्ये काही दिवसांपूर्वी एका बनावट लसीकरण शिबीराचा पर्दाफाश झाला. तृणमूलच्या खासदार मिमी चक्रवर्ती यांचीही या शिबीरात फसवणूक झाली. त्यांनी दिलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी या शिबीराचे आयोजन करणारा बोगस आयएएस अधिकारी देबांजन देव याला अटक केली. त्यानंतर काही दिवसांतच आणखी एका आयएएस अधिकाऱ्याला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. त्यांच्याकडून खासदार डोला सेन यांना फसवण्याचे षडयंत्र रचले जात होते. 

हेही वाचा : उद्योगमंत्र्यांनी जनसुनावणीतच केली तहसीलदारांची पोलखोल

बनावट शिबीर उघडकीस आल्यानंतर भाजपकडून ममता सरकारवर टीका सुरू करण्यात आली. केंद्रीय आरोग्य मंत्रालयानंही तातडीने याबाबतचा अहवाल मागवला. तसेच भाजपने याची सीबीआय चौकशी करण्याची मागणी केली आहे. भाजपकडून हा मुद्दा उचलून धरला जात असतानाच तृणमूलने थेट राज्यपालांना लक्ष्य केलं आहे. तृणमूलचे खासदार सुखेंदू शेखर रॅाय यांनी पत्रकार परिषदेत राज्यपाल जगदीप धनखर यांच्यावर टीकास्त्र सोडलं. 

रॅाय यांनी देबांजनच्या सुरक्षारक्षकाचे राज्यपालांच्या कुटूंबियांसमवेतचे छायाचित्र प्रसिध्द केले. तसेच देबांजन व सुरक्षारक्षकाचे छायाचित्र प्रसिध्द करत त्यांनी राज्यपालांचे देबांजनशी संबंध असल्याचा दावा केला. या सुरक्षारक्षकामार्फत राज्यपालांना विशेष भेटवस्तू, पाकिटे पाठविली जात असावीत असा आरोपही त्यांनी केला. आम्ही या प्रकरणाचा तपास करणाऱ्यांचे याकडे लक्ष्य वेधू इच्छितो. याबाबतची खरी माहिती समोर यायला हवी, असे रॅाय म्हणाले.

लोकांची फसवणूक करणाऱ्या व्यक्तीशी राज्यपालांचे संबंध असतील तर हे खूप दुर्दैवी आहे. राज्यपाल अनेक विषयांवर बोलत असतात. पण बनावट लसीकरणावर ते गप्प का आहेत, असा सवालही रॅाय यांनी उपस्थित केला. राज्य सरकारचा याचा तपास करेल. विशेष तपास पथक याचा तपास करत असून त्याचा अहवाल समोर आल्यानंतर सगळं चित्र स्पष्ट होईल, असेही रॅाय म्हणाले.

हेही वाचा : ईडीचा न्यायालयात खळबळजनक दावा; आणखी मंत्री अडचणीत येणार

काय आहे प्रकरण?

कोलकता महापालिकेच्या नावाखाली शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. याबाबत मिमी चक्रवर्ती यांनी पोलिसांत तक्रार दिली आहे. त्यांनी या शिबीराl कोविशिल्ड लशीचा पहिला डोसही घेतला. या शिबीरात त्यांना प्रमुख पाहूणे म्हणून बोलावण्यात आले होते. लस घेण्यासाठी नोंद करताना आधार कार्डची मागणीही करण्यात आली नाही, त्याचवेळी संशय आला होता. त्यामुळं नोंदणीचा संदेश कुणाच्याही मोबाईलवर आला नाही. तसेच लस घेतल्यानंतर काही वेळात प्रमाणपत्र मिळेल, असेही आयोजकांनी सांगितले. पण कुणालाही हे प्रमाणपत्र मिळाले नाही.

महापालिकेकडून असं कोणतंही शिबीर याभागात आयोजित केले नसल्याचे सांगितले. तसेच स्थानिक नगरसेवकांनाही याबाबत माहिती नव्हती. त्यामुळं हे शिबीर बोगस असल्याचं स्पष्ट झालं. पोलिसांना याबाबत माहिती दिल्यानंतर सायंकाळी सहा वाजता ते शिबीराच्या ठिकाणी पोहचले. तिथे आयोजक असलेल्या देबांजन या व्यक्तीने आपण आयएएस अधिकारी असून महापालिकेचे उपायुक्त असल्याचे सांगत ओळखपत्र दाखवलं. पण त्यानंतरही त्यांना अटक करून पोलिस ठाण्यात नेण्यात आले. तिथे त्याने आपला गुन्हा कबूल केला. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख