'ईडी'चा न्यायालयात खळबळजनक दावा; आणखी मंत्री अडचणीत येणार

मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी देशमुखांनावर 100 कोटी वसुलीचा आरोप केला आहे.
Special PMLA Court sends Kundan Shinde and Sanjeev Palande to ED custody
Special PMLA Court sends Kundan Shinde and Sanjeev Palande to ED custody

मुंबई : माजी गृहमंञी अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांचे स्वीय सहाय्यक संजीव पलांडे आणि कुंदन शिंदे यांच्या कोठडीची मागणी करताना सक्तवसुली संचालनालयाने (ED) आज न्यायालयात खळबळजनक दावा केला आहे. या प्रकरणात अनेक मंत्र्यांची नावंही समोर आली असून याबाबत माहिती गोळा करणं गरजेची असल्याचं ईडीने न्यायालयात सांगितलं आहे. त्यामुळे आता या प्रकरणात महाविकास आघाडी सरकारमधील आणखी मंत्री जाळ्यात अडकतील, असे संकेतच ईडीनं दिले आहेत. दरम्यान, दोघांच्या कोठडीत पाच दिवसांची वाढ करण्यात आली आहे. (Special PMLA Court sends Kundan Shinde and Sanjeev Palande to ED custody)

मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग (Parambir Singh) यांनी देशमुखांनावर 100 कोटी वसुलीचा आरोप केला आहे. या प्रकरणासह काळ्या पैशांच्या तक्रारीचा तपास ईडीकडून केला जात आहे. ईडीने 25 जूनला देशमुख यांच्या नागपूर व मुंबईतील घरांवर छापे टाक झाडाझडती घेतली. तसेच देशमुख यांच्यासह त्यांचे कुटूंबीय, पलांडे व शिंदे यांचेही जबाब घेतले. त्यानंतर पलांडे व शिंदे या दोघांना अटक करण्यात आली. त्यांना 1 जुलैपर्यंत ईडीच्या विशेष न्यायालयानं एक जुलैपर्यंत कोठडी सुनावली होती. 

दोघांच्या कोठडीची मुदत आज संपत असल्याने त्यांना न्यायालयात हजर करण्यात आलं होतं. त्यावर ईडीनं दोघांच्या कोठडीची मुदतवाढ मागताना न्यायालयात मोठा दावा केला. अनेक मंञ्यांची नावं समोर आली असून याबाबत माहिती गोळा करणं गरजेचं आहे. संशयित आणि आरोपींची समोरा समोर बसून चौकशी करणं गरजेचं आहे. तसेच 29 जून रोजी नोंदवलेल्या जबाबात दोघांनी सचिन वाझेला ओळखत नसल्याचं सांगितलं. ईडीने इलेक्ट्राँनिक्स पुरावे दाखवले असता, चुकून कधी तरी भेट झाली असल्याचा युक्तीवाद करण्यात आला, असे न्यायालयात सांगण्यात आले. 

ईडीच्या चौकशीत काही बदल्यांसंदर्भात पुरावे मिळाले आहेत. याचा तपास करणं गरजेचं आहे. हे गुन्हे संजीव पलांडे यांच्या संबंधित आहेत. या प्रकरणात झालेल्या पैशांच्या व्यवहाराची माहिती गोळा करायची आहे. त्यासाठी सात दिवसांची पोलिस कोठडी वाढवून देण्याची मागणी ईडीच्या वकिलांनी न्यायालयात केली. त्यानुसार न्यायालयानं पाच दिवसांची कोठडी वाढवली असून सहा जुलैपर्यंत दोघेही कोठडीत राहतील. 

दरम्यान, परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या आठ पानी पत्रांत गृहमंत्र्यांनी वाझेला बोलावून कसे हफ्ते गोळा करायला सांगितले, हे सविस्तर लिहिले होते. याबाबत झालेल्या बैठकांना गृहमंत्र्यांचे खासगी सचिव संजीव पलांडे हे पण उपस्थित होते, असा उल्लेख परमबीरसिंह यांनी होता. पलांडे हे मूळचे पुणे जिल्ह्यातील मुखई येथील आहेत. त्यांचे वडील हे सूर्यकांत पलांडे हे माजी आमदार आहेत. शरद पवार यांच्या समाजवादी काँग्रेसमधून ते 1980 मध्ये आमदार झाले. अभ्यासू आमदार म्हणून त्यांची ओळख आहे. पलांडे यांनी या आधीचे गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्याकडे विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून काम पाहिले होते. त्यांचा तेथील अनुभव पाहूनच देशमुखांनी त्यांना घेतले होते. परमबीरसिंह यांनी त्यांच्या आठ पानी पत्रात बऱ्याच वेळा पलांडे यांच्या नावाचा उल्लेख केला होता.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com