लोकसभेत रणकंदन : दहा खासदारांवर निलंबनाची टांगती तलवार

मागील आठवड्यात पेगॅससच्या मुद्यावरूनच एका खासदाराचे निलंबन करण्यात आले आहे.
Government may move suspension notice against 10 mps
Government may move suspension notice against 10 mps

नवी दिल्ली : संसदेच्या पावसाळी अधिवेशनात सलग आठव्या दिवशीही विरोधकांनी गोंधळ घातल्याने सतत अडथळे आले आहे. अधिवेशनच्या आदल्यादिवशीच पेगॅसस स्पायवेअरचे प्रकरण बाहेर आल्यानंतर विरोधकांनी सरकारला घेरलं आहे. त्यावरून मागील आठवड्यात राज्यसभेत रणकंदन झालं होतं. तर अधिवेशनाच्या आठव्या दिवशीही असंच दृश्य लोकसभेत पाहायला मिळालं. (Government may move suspension notice against 10 mps)

पेगॅसस प्रकरणावरून चर्चेची मागणी विरोधकांकडून केली जात आहे. तसेच या प्रकरणाची चौकशी सर्वोच्च न्यायालयाच्या निगराणीखाली करण्याची मागणीही विरोधकांनी केली आहे. पण सरकारकडून या मुद्यावर चर्चेला नकार देण्यात आला आहे. त्यावरून बुधवारी विरोधकांनी लोकसभेत जोरदार घोषणाबाजी केली. तर दहा खासदारांनी संसदेतच कागद फाडत लोकसभा अध्यक्षांच्या दिशेने भिरकावले. 

या प्रकारावरून भाजपनेही आक्रमक पवित्रा घेतला आहे. कागद फाडणाऱ्या दहा खासदारांचे निलंबन करण्याचा प्रस्ताव सरकारकडून आणला जाण्याची शक्यता आहे. हा प्रस्ताव मान्य झाल्यास दहा खासदारांना अधिवेशनात सहभागी होता येणार नाही. या खासदारांमध्ये टी. एन. प्रतापन, हिबी ईडन, रवनीत सिंह बिट्टू, गुरजीत सिंह औजला, मणिकम टागोर, दीपक बैज, ए. एम. आरिफ, डीन कुरियाकोस, ज्योतीमणी, सप्तगिरी उलाका यांचा समावेश आहे. 

दरम्यान, केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी खासदारांच्या कृतीवर तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली आहे. काँग्रेस व तृणमूलच्या सदस्यांनी अध्यक्षांच्या दिशेने कागद फेकले. संसदेतील अधिकाऱ्यांच्या दिशेनेही ते गेले. जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीचा ही अपमान करणारी घटना आहे. लोकशाहीमध्ये विरोधाला काही मर्यादा असते. पण काँग्रेस व तृणमूलच्या खासदारांनी सर्व मर्यादा पार केल्या आहेत, अशी टीका ठाकूर यांनी केली. 

मागील आठवड्यातच एका खासदाराचे निलंबन

मागील आठवड्यात पेगॅससच्या मुद्यावरूनच एका खासदाराचे निलंबन करण्यात आले आहे. माहिती व तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडून या प्रकरणावर निवेदन सादर केले जात असताना तृणमूलचे खासदार शंतनु सेन यांनी राज्यसभेत त्यांच्या हातातील कागद हिसकावून घेतले. हे कागद फाडत त्यांनी हवेत भिरकावून दिले होते. या प्रकारानंतर सेन यांना निलंबित करण्यात आले आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com