काँग्रेस सोडणाऱ्यांची रांग; काही तासांतच काँग्रेसचे दोन आमदार भाजपवासी

मागील काही महिन्यांपासून काँग्रेसला रामराम ठोकणाऱ्या नेत्यांची जणू रांगच लागली आहे.
Congress MLA Sushanta Borgohain joins BJP
Congress MLA Sushanta Borgohain joins BJP

नवी दिल्ली : मागील काही महिन्यांपासून काँग्रेसला रामराम ठोकणाऱ्या नेत्यांची जणू रांगच लागली आहे. काही तासांपूर्वीच मणिपूरच्या माजी प्रदेशाध्यक्षांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर आता आसामधील एका आमदाराने काँग्रेस सोडली आहे. हा आमदारही भाजपवासी झाल्याने काँग्रेस झटका बसला आहे. (Congress MLA Sushanta Borgohain joins BJP)  

उत्तर प्रदेशातील नेते जतिन प्रसाद यांनी काही दिवसांपूर्वीच भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यानंतर आता मणिपुरमधील माजी प्रदेशाध्यक्ष गोविनदास कोंथूजाम यांनीही रविवारी भाजपमध्ये प्रवेश केला. दिल्लीत भाजप मुख्यालयात हा प्रवेश झाला. काँग्रेससाठी हा मोठा झटका मानला जात होता. या प्रवेशाला काही तास उलटत नाहीत तोच आसाममधील नेते व आमदार सुशांत बोरगोहेन यांनीही भाजपची वाट धरली आहे. 

बोरगोहेन हे आसाममधील जोरहाट जिल्ह्यातील थौरा मतदारसंघाचे आमदार आहे. भाजपच्या गुवाहाटी येथील कार्यालयात त्यांचा पक्षप्रवेश झाला. त्यांनी शुक्रवारीच काँग्रेसचा राजीनामा दिला होता. ते मागील काही दिवसांपासून भाजपच्या संपर्कात असल्याचे स्पष्ट झालं होतं. त्याबाबत त्यांना पक्षाकडून नोटीसही बजावण्यात आली होती. बोरगोहेन यांच्याआधी मरियानीचे आमदार रुपज्योति कुर्मी यांनीही काँग्रेस सोडत भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

आसाममधील सलग दुसऱ्यांचा भाजप सत्तेत आली आहे. त्यानंतर तीन महिन्यांतच काँग्रेसचे दोन आमदार भाजपमध्ये दाखल झाले आहेत. त्यामुळं हा काँग्रेससाठी मोठा धक्का मानला जात आहे. आसाममधील आणखी काही स्थानिक नेतेही भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. 

दरम्यान, मणिपूरमध्येही पुढील वर्षी विधानसभेच्या निवडणुका होणार आहे. गोविंनदास यांनी डिसेंबर 2020 मध्येच प्रदेशाध्यक्ष करण्यात आले होते. 2017 मध्ये झालेल्या निवडणुकीत काँग्रेसला सर्वाधिक जागा मिळाल्या होत्या. पण भाजपने इतर पक्षांना हाताशी धरून सत्ता स्थापन करत काँग्रेसचा हातातोंडाशी आलेला घास काढून घेतला होता. आगामी निवडणुकीत गोविंनदास हे काँग्रेसकडून मुख्यमंत्रीपदाचे दावेदार मानले जात होते. पण त्यांनी पक्षश्रेष्ठींवर नाराजी व्यक्त करत पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर रविवारी भाजपमध्ये प्रवेश करत पक्षाला झटका दिला. त्यांनी 21 जुलै रोजी पक्षाच्या सदस्यत्वाचा तर 28 जुलैला आमदारकीचाही राजीनामा दिला आहे. ते विष्णुपूर मतदारसंघाचे आमदार होते. 


गोविंनदास म्हणाले, 'भाजपमध्ये मी पूर्ण क्षमतेने काम करेन. मणिपूरमध्ये पुढील वर्षी होणाऱ्या निवडणुकीत भाजपला बहुमत मिळवून देण्यासाठी मनापासून काम करेन.' गोविंनदास यांच्या राजीनाम्यानंतर काँग्रेसमध्ये खळबळ उडाली. त्यानंतर हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी यांना राज्यातील स्थितीबाबत माहिती देण्यात आली आहे. त्यांच्याकडून लवकरच पुढील दिशा ठरवली जाईल, असे मणिपुर काँग्रेसमधील नेत्यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com