चाळीस वर्षे काँग्रेसचं कार्यालय सांभाळलं अन् तिथंच घेतला अखेरचा श्वास

उत्तम भूमकर हे 82 वर्षांचे होते. त्यांच्या आयुष्यातील जवळपास 40 वर्षे त्यांनी काँग्रेस भनवमध्ये घालवली.
Congress worker Uttam Bhumkar Died in office
Congress worker Uttam Bhumkar Died in office

पुणे : काँग्रेसचे निष्ठावान कार्यकर्ते व पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे कार्यालय सचिव उत्तमराव भूमकर यांचे रविवारी निधन झाले. मागील चाळीस वर्षांपासून काँग्रेस भवन या कार्यालयात निष्ठेने काम करत राहिले. अखेर रविवारी त्यांना कार्यालयातच हृदयविकाराचा झटका आला. यातच त्यांचे निधन झाल्याने कार्यकर्ते व नेत्यांनी दु:ख व्यक्त केले. (Congress worker Uttam Bhumkar Died in office)

उत्तम भूमकर हे 82 वर्षांचे होते. त्यांच्या आयुष्यातील जवळपास 40 वर्षे त्यांनी काँग्रेस भनवमध्ये घालवली. रविवारी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास त्यांचे निधन झाले. सोमवारी (ता. 2) ते 83 व्या वर्षात पर्दापण करणार होते. नु. म. वि. मध्ये शिक्षण घेतल्यानंतर ते संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात सहभागी झाले. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यानंतर 1960 ते 1968 पर्यंत त्यांनी स्वत:ला सामाजिक कार्यात वाहून घेतले होते.

महाराष्ट्र हरिजन सेवक संघ, युवक क्रांती दल यांच्या माध्यमातून त्यांनी अनेक आंदोलनामध्ये व मोर्चामध्ये भाग घेतला, जेलमध्येही गेले. 1979 च्या मनपा निवडणुकीनंतर ते शिक्षण मंडळ येथे सदस्य झाले. 1979-80 शिक्षण मंडळाचे उपाध्यक्षही होते. त्यावेळी ते नागरिक संघटनेत होते. 1980 साली भूमकर काँग्रेसमध्ये आले. त्यावेळचे अध्यक्ष प्रकाश ढेरे व खासदार बॅ. विठ्ठलराव गाडगीळ यांनी सुचविल्याप्रमाणे ते काँग्रेस भवनमध्ये कार्यालय सचिव म्हणून काम करीत होते.

1997 साली त्यांनी काँग्रेसच्या ज्येष्ठ नागरिक संघाची स्थापना केली. ज्येष्ठ नागरिक संघामार्फत त्यांनी सांस्कृतिक कार्यक्रम, व्याख्याने व ज्येष्ठांसाठी आनंद मेळावे घेतले होते. काँग्रेस पक्षाच्या दैनंदिन कामकाज अतिशय चोखपणे करायचे. भारताच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त होणाऱ्या ‘व्यर्थ न हो बलिदान’ हे अभियानाच्या तयारीसाठी त्यांनी भरपूर मेहनत घेतली. 

भूमकर यांनी आपला अखेरचा श्वास काँग्रेस भवनमध्येच घेतला. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुली, जावई व नातवंडे असा परिवार आहे. भूमकर यांच्या आकस्मित निधनामुळे काँग्रेस पक्षाने एक निष्ठावंत कार्यकर्ता व नविन पिढीला मार्गदर्शन करणारे एक ज्येष्ठ व्यक्तिमत्व गमावले. त्यांच्या निधनाची बातमी समजताच माजी मुख्यमंत्री पृथ्वीराजजी चव्हाण, पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष रमेश बागवे, ॲड. अभय छाजेड डॉ. श्रीपाल सबनीस, कमल व्यवहारे, सुलभा भोंडवे व इतर पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आपला शोक व्यक्त केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com