भाजपमधील कलह चव्हाट्यावर; प्रदेशाध्यक्षांवर खासदाराची नाराजी दूर करण्याची जबाबदारी 

फेसबुक पोस्टच्या माध्यमातून राजकारण संन्यासाची घोषणा केली आहे.
Dilip Ghosh will address the issue with Babul Supriyo
Dilip Ghosh will address the issue with Babul Supriyo

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी केंद्रीय मंत्रिमंडळाचा (Union Cabinet) मेगाविस्तार करताना 12 मंत्र्यांना डच्चू दिला होता. यामध्ये पश्चिम बंगालमधील भाजप खासदार बाबुल सुप्रियो (Babul Supriyo) यांचाही समावेश होता. त्यावरून नाराज झालेल्या बाबुल यांनी राजकारणातून संन्यास घेण्याची घोषणा केली आहे. ही घोषणा करताना त्यांनी स्थानिक नेत्यांवरही टीका केली. त्यामुळे बंगाल भाजपमधील कलह चव्हाट्यावर आला आहे. (Dilip Ghosh will address the issue with Babul Supriyo)

सुप्रियो यांनी फेसबुक पोस्टच्या माध्यमातून राजकारण संन्यासाची घोषणा केली आहे. त्यांनी म्हटले आहे की, गुडबाय, मी कोणत्याही राजकीय पक्षात प्रवेश करणार नाही. तृणमूल काँग्रेस, काँग्रेस, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष यापैकी कुणीही मला बोलावलेले नाही तसेच, मीसुद्धा तेथे जणार नाही. सामाजिक कार्य करण्यासाठी राजकारणात राहण्याची आवश्यकता नाही. मी खासदारकीचा राजीनामा देत आहे. याचबरोबर मला खासदार म्हणून मिळालेले निवासस्थान महिनाभरात रिकामे करेन. 

या घोषणेनं बंगाल भाजप हादरली आहे. सुप्रियो यांच्या या भूमिकेमागं भाजपमधील अंतर्गत राजकारण आणि साठमारी असल्याचं बोललं जात आहे. भाजपच्या बंगालमधील पराभवालाही हेच कारणीभूत असल्याचे राजकीय विश्लेषक सांगतात. दरम्यान, सुप्रियो यांनी रविवारीही एक फेसबूक पोस्ट लिहित प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष यांच्यावर टीका केली. तसेच यापुढे पार्श्वगायन  व गाण्याच्या कार्यक्रमांवर लक्ष केंद्रीत करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केलं आहे. दिलीप घोष यांनी म्हटले होते, की फेसबुक पोस्ट लिहून राजकारण सोडले जात नाही हे सुप्रियो यांना कोणीतरी समजवावे.

दरम्यान, सुप्रियो यांची मनधरणी करण्यासाठी भाजपकडून प्रयत्न सुरू करण्यात आल्याचे समजते. राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनीही त्यांची भेट घेतली. तसेच दिलीप घोष व कैलास विजयवर्गिय यांच्यावरही ही जबाबदारी सोपवण्यात आल्याचे सुत्रांनी सांगितले. गृहमंत्री अमित शहा व भाजप अध्यक्ष जे पी नड्डा या दोघांशीही सुप्रियो यांनी चांगले संबंध आहेत. त्यामुळे सुप्रियो यांचे मन वळवण्यात त्यांना कितपत यश मिळते, हे पाहावे लागेल. 

बंगालमधील पराभवानंतर भाजपला धक्के

बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसला धोबीपछाड देण्यासाठी त्वेषाने मैदानात उतरलेल्या भाजपचा पराभव झाला. या पराभवानंतर भाजपला सोडून जाणाऱ्यांनी जणू रांगच लागली आहे. तृणमूलमधील भाजपमध्ये आलेले काही माजी आमदार, खासदारांची घरवापसी झाली. त्यात राष्ट्रीय उपाध्यक्ष मुकूल रॉय यांचाही समावेश आहे. आता सुप्रियो यांनी राजकारणातून संन्यास घेण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे बंगालमधील भाजपसमोरील संकेट कमी होताना दिसत नाहीत. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com