काहीही बोलू नका! मुख्यमंत्र्यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्षांच्या सल्लागारांना झापलं

सिद्धू यांनी चार सल्लागारांची नेमणूक केली आहे. त्यापैकी प्यारे लाल गर्ग व मलविंदर माली यांनी नुकतेच वादग्रस्त वक्तव्य केलं होते.
CM Amarinder Singh slams Navjot singh Sidhus Advisor
CM Amarinder Singh slams Navjot singh Sidhus Advisor

चंदीगड : पंजाब (Punjab) काँग्रेसचे अध्यक्ष नवजोत सिंग सिद्धू यांनी आपल्या दिमतीला ठेवलेल्या सल्लागारांमुळं मोठा वाद निर्माण झाला आहे. दोन सल्लागारांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यांनंतर मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग या वादात उडी घेतली आहे. सिद्धू व मुख्यमंत्र्यांमध्ये आधीच वाद असताना आता सल्लागारांमुळे त्यात आणखी भर पडली आहे. मुख्यमंत्र्यांनी थेट सल्लागारांवर निशाणा साधला आहे. (CM Amarinder Singh slams Navjot singh Sidhus Advisor)

सिद्धू यांनी चार सल्लागारांची नेमणूक केली आहे. त्यापैकी प्यारे लाल गर्ग व मलविंदर माली यांनी नुकतेच वादग्रस्त वक्तव्य केलं होते. माली यांनी मागील आठवड्यात काश्मीरबाबत वादग्रस्त वक्तव्य करून पक्षाला अडचणीत आणलं होतं. तर गर्ग यांनी थेट अमरिंदर सिंग यांनी पाकिस्तानवर केलेल्या टीकेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केलं होतं.

दोन्ही सल्लागारांची वक्तव्य समोर आल्यानंतर अमरिंदर सिंग यांनी त्यांच्यावर निशाणा साधला आहे. माली यांच्या वक्तव्यावर बोलताना ते म्हणाले, काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग आहे आणि राहील. त्यांचे वक्तव्य पूर्णपणे राष्ट्रविरोधी आहे. त्यांची वक्तव्य पूर्णपणे चुकीची आणि पाकिस्तान व काश्मीवर भारत व काँग्रेसच्या भूमिकेच्या विरोधी आहेत. 

तसेच मुख्यमंत्र्यांनी त्यांना संवेदशनशील मुद्यांवरन बोलण्याचा इशारा दिला आहे. सिद्धूंनी आपल्या सल्लागारांवर नियंत्रण ठेवावं. त्यांनी पंजाब काँग्रेस अध्यक्षांनाच सल्ले द्यावेत. ज्या गोष्टींविषयी आपल्या खूप माहिती नाही किंवा काहीच माहिती नाही, त्यावर बोलू नये, असा सल्ला मुख्यमंत्र्यांनी दिला आहे. 

दरम्यान, रविवारी माली यांनी थेट माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांचंच एक वादग्रस्त चित्र फेसबुकवर टाकल्यानं काँग्रेसलाच धक्का बसला आहे. या चित्रामध्ये मानवी कवटींच्या ढिगाजवळ इंदिरा गांधी उभ्या राहिल्या आहेत. त्यांच्या हातात एक बंदूक असून त्यालाही मानवी कवटी लटकलेली दिसत आहे. या वादग्रस्त चित्रावरून विरोधकांनीही काँग्रेसवर निशाणा साधला आहे. तसेच काँग्रेसमधील नेत्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. 

हे चित्र एका पंजाबी नियतकालिकामध्ये जून 1989 मध्ये छापून आले आहे. 1984 मध्ये झालेल्या शीखविरोधी दंगलीची आठवणं करून देणारं हे चित्र असल्यानं पंजाब काँग्रेसमध्ये खळबळ उडाली आहे. भाजप नेते तरूण चुघ यांनी या चित्रावरून थेट सिध्दू यांच्यावर निशाणा साधला आहे. फेसबुकवर अशी पोस्ट करण्याबाबत माली यांनी सिध्दू यांना विचारले होते का?, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com