मोदी-शहांच्या 'या' निर्णयांनीही पक्षातील मातब्बर नेत्यांना चकवा!

भाजपमध्ये मोदी-शहा यांच्या सहमतीशिवाय कोणताही निर्णय होत नाही. पण हे निर्णय घेताना त्यांनी अनेकदा धक्के दिले आहेत.
मोदी-शहांच्या 'या' निर्णयांनीही पक्षातील मातब्बर नेत्यांना चकवा!
Narendra Modi Amit Shah

गांधीनगर : पंतप्रधान नरेंद्र मोदी अन् गृहमंत्री अमित शहा यांच्या जोडीने राजकारणात अनेकदा धक्के दिले आहेत. माध्यमांसह पक्षातील नेत्यांना कसलीही कुणकूण लागू न देता ते आश्चर्यकारक निर्णय घेतात. याचं ताजं उदाहरण म्हणजे भूपेंद्र पटेल. गुजराच्या मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत पटेल यांच्या नावाचा कुणीही साधा उल्लेख केला नव्हता. इतर बड्या नेत्यांची नावंच चर्चेत होती. पण मोदी-शहांनी नेहमीप्रमाणेच सर्वांना धक्का देत पटेल यांचं नाव पुढे केलं आहे. (Some of Modi Shahs decisions also shocked party leaders)

भाजपमध्ये मोदी-शहा यांच्या सहमतीशिवाय कोणताही निर्णय होत नाही.  पण हे निर्णय घेताना त्यांनी अनेकदा धक्के दिले आहेत. 2014 मध्ये सत्तेत आल्यानंतर मोदी सरकारनं असेच अनेक निर्णय घेतले आहेत. पक्षांतर्गत निर्णयांनीही पक्षातील अनेकांना धक्क दिले आहेत.

भूपेंद्र पटेल हे 2017 मध्ये पहिल्यांदाच आमदार झाले आहेत. त्यांना विधीमंडळ कामकाजाचा फारसा अनुभव नसतानाही त्यांना मुख्यमंत्रीपद देण्यात आलं आहे. यामागं अर्थातच राजकीय गणित आहे. पुढील वर्षी राज्याच्या निवडणुका होत असून पाटीदार समाजाला खूश करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याची चर्चा आहे. पण पटेल यांचं नावाची आधी चर्चाही नसल्यानं अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला.

कर्नाटक अन् उत्तराखंड हे ताजं उदाहरण 

जुलै 2021 मध्ये भाजपने उत्तराखंडचे मुख्यमंत्री बदलले. यावेळीही भाजपनं धक्का दिला होता. पुष्कर सिंह धामी हे उत्तराखंडच्या मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत कधीही नव्हते. सतपाल महाराज, धनसिंह रावत यांच्यासारखे मातब्बर नेत्यांचीच चर्चा होती. पण भाजपने धामी यांचं नाव जाहीर करत धक्का दिला होता. 

कर्नाटकमध्येही बी. सी. पाटील, प्रल्हाद जोशी, सी. टी. राव या नेत्यांची नावं मुख्यमंत्रीपदासाठी चर्चेत होती. पण इथेही मोदी-शहांनी धक्का दिला. तत्कालीन गृहमंत्री बसवराज बोम्मई यांच्या गळ्यात मुख्यमंत्रीपदाची माळ टाकली. दोन्हीवेळी माध्यमांना त्यांच्या नावांची कुणकूणही लागली नव्हती. 

राष्ट्रपती अन् लोकसभा अध्यक्ष निवडीवेळीही धक्का

2017 मध्ये राष्ट्रपती पदासाठी रामनाथ कोविंद यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. त्यावेळी त्यांच्या नावाची कोणतीही चर्चा नव्हती. कोविंद हे त्यावेळी बिहारचे राज्यपाल होते. या पदासाठी पक्षातील बड्या नेत्याच्या सहमती होईल, असं बोललं जात होतं. 

त्याचप्रमाणे ओम प्रकाश बिर्ला हेही धक्का देणारं नाव होतं. जून 2019 मध्ये बिर्ला यांचं नाव लोकसभा अध्यक्षपदासाठी पुढं कऱण्यात आलं अन् अनेकांना धक्का बसला. या शर्यतीत त्यावेळी मनेका गांधी, राधामोहन सिंह, रमापति राम त्रिपाठी, एस. एस. अहलुवालिया, डॉ. वीरेंद्र कुमार या नेत्यांची नाव चर्चेत होती. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.