अमित शहा रात्रीच दिल्लीतून आले अन् मुख्यमंत्री पदाचा निर्णय घेऊन गेले!

रुपानी यांनी अचानक राजीनामा दिल्यानं सर्वानांच धक्का बसला.
अमित शहा रात्रीच दिल्लीतून आले अन् मुख्यमंत्री पदाचा निर्णय घेऊन गेले!
Gujarat BJP MLAs are meeting to elect the Chief Minister

गांधीनगर : गुजरातचे (Gujarat) मुख्यमंत्री (Chief Minister) विजय रुपानी (Vjay Rupani) यांच्यासह मंत्रिमंडळाने शनिवारी तडकाफडकी राजीनामा दिल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. रुपानी यांचा वारसदार कोण, हे ठरवण्यासाठी भाजप आमदारांची बैठक सुरू आहे. यामध्ये नवीन मुख्यमंत्र्यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले जाणार आहे. पण हे नाव केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांच्या शुक्रवारी अचानक झालेल्या गुजरात दौऱ्यातच ठरल्याची चर्चा आहे. (Gujarat BJP MLAs are meeting to elect the Chief Minister)

रुपानी यांनी अचानक राजीनामा दिल्यानं सर्वानांच धक्का बसला. शनिवारी ते राज्यपालांना भेटायला गेले त्यावेळी ही नेहमीचीच भेट असल्याचे किंवा मंत्रिमंडळ विस्ताराबाबत चर्चा करण्यासाठी गेल्याचे बोलले जात होते. पण काही वेळातच रुपानी यांनी राज्यपालांकडं राजीनामा सोपवल्याचं समोर आलं. त्यामुळं राज्याच्या राजकारणात चर्चांना उधाण आलं. रुपानी यांचा भाजप नेतृत्वानं राजीनमा घेण्यामागे अनेक कारणेही आहेत. 

पण रुपानी यांनी शनिवारी राजीनामा दिला असला तरी त्यावर शुक्रवारी रात्री उशिरा शिक्कामोर्तब झालं आहे. गृहमंत्री अमित शहा हे शुक्रवारी रात्री उशिरा दिल्लीतून गुजरातमध्ये आले होते. त्यानंतर त्यांनी वरिष्ठ नेत्यांची बैठक घेतली. ही बैठक बराच वेळ चालली होती. या बैठकीतच रुपानी यांच्या राजीनाम्याचा निर्णय झाल्याचं समजतं. तसेच नवीन मुख्यमंत्री कोण, यावरही बैठकीत चर्चा झाल्याचे बोलले जात आहे. 

दुसऱ्या दिवशी सकाळी शहा दिल्लीला परत गेले अन् रुपानी यांनी राजभवन गाठत राजीनामा दिला. त्यानंतर रविवारी भाजपने विधिमंडळ पक्षाची बैठक बोलावली. ही बैठक सध्या सुरू असून काही वेळातच नवीन मुख्यमंत्र्यांचे नाव जाहीर केलं जाणार आहे. या बैठकीत केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडवीय हेही सहभागी झाले आहेत. त्यांचंही नाव मुख्यमंत्री पदासाठी आघाडीवर आहे.  

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडवीय यांचे नाव मुख्यमंत्रिपदासाठी आघाडीवर आहे. मांडवीय गुजरातमधील भावनगरचे आहेत. ते गुजरात विधानसभेवरही निवडून गेले होते. ते राज्यातून राज्यसभेवर गेले आहेत. मांडवीय हे काही वेळापूर्वी रूपानी यांच्या निवासस्थानीही दाखल झाले आहेत. मांडवीय यांना नुकतीच केंद्रात राज्यमंत्रिपदावरून कॅबिनेट मंत्रिपदी बढती देण्यात आली होती. कोरोना संकटाच्या काळात त्यांच्यावर अतिशय महत्वाच्या अशा आरोग्य खात्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. आता त्यांच्यावर मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी सोपवली जाईल, अशी माहिती सूत्रांनी दिली. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in