माजी मुख्यमंत्र्यांचं तिकीट कापलं अन् पहिल्यांदाच आमदारकी मिळवत झाले मुख्यमंत्री

विजय रुपानी (Vjay Rupani) यांच्यासह मंत्रिमंडळाने शनिवारी तडकाफडकी राजीनामा दिल्यानं राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती.
Bhupendra Patel became MLA for the first time and got CM post
Bhupendra Patel became MLA for the first time and got CM post

गांधीनगर : गुजरातचे (Gujarat) नवे मुख्यमंत्री (Chief Minister) म्हणून आमदार भूपेंद्र पटेल लवकरच विराजमान होतील. मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत असलेल्या बड्या नेत्यांना डावलून भाजपनं पटेल यांच्या गळ्यात मुख्यमंत्रीपदाची माळ टाकली. विधिमंडळ कामकाजाचा जेमतेम चार वर्षांचा अनुभव असलेले पटेल मुख्यमंत्री होणार असल्यानं अनेकांना धक्का बसला आहे. (Bhupendra Patel became MLA for the first time and got CM post)

विजय रुपानी (Vjay Rupani) यांच्यासह मंत्रिमंडळाने शनिवारी तडकाफडकी राजीनामा दिल्यानं राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती. रुपानी यांचा वारसदार कोण, याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. अनेकांच्या नावांवर चर्चा सुरू होती. पण अचानक भूपेंद्र पटेल यांचं नाव समोर आलं अन् त्यांच्या नावाची मुख्यमंत्री म्हणून घोषणा करण्यात आली आहे. पटेल हे गुजरातमधील मोठं नाव असलं तरी राज्याच्या कामकाजात त्यांचा फारसा अनुभव नाही.

पटेल हे 59 वर्षांचे असून घाटलोदिया मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत आहेत. माजी मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल या मतदारसंघातून निवडणूक लढवत होत्या. पण वयाचं कारण देत आनंदीबेन पटले यांचं तिकीट कापण्यात आलं. त्यांच्याजागी भूपेंद्र पटेल यांना उमेदवारी मिळाली. या निवडणुकीत त्यांनी काँग्रेसच्या उमेदवाराचा तब्बल 1 लाख 17 हजाराहून अधिक मतांनी पराभव केला. 

तत्पूर्वी, पटेल हे अहमदाबाद नगर विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष होते. 1999 ते 2000 या कालावधीत मेमनागागर नगरपालिकेचे अध्यक्ष, 2008 ते 10 मध्ये अहमदाबाद महापालिकेच्या शाळा मंडळाचे उपाध्यक्ष तर 2010 ते 2015 या कालावधीत नगरसेवक होते. स्थायी समितीचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम पाहिलं आहे. 

आनंदीबेन पटेल यांचे निकटवर्तीय म्हणून भूपेंद्र पटले यांची ओळख आहे. तसेच ते पाटीदार समाजाचे असल्यानं त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याचं बोललं जात आहे. सरदार धाम आणि विश्व उमिया फाऊंडेशन या पाटीदार संस्थांचे ते विश्वस्तही आहेत. भूपेंद्र पटेल यांच्या आनंदीबेन पटेल यांचाही आग्रह केल्याची चर्चा आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com